|Friday, August 23, 2019
You are here: Home » Top News » आघाडीचा अभिनेता सुबोध भावे घेऊन येतोय “लाखांची गोष्ट”

आघाडीचा अभिनेता सुबोध भावे घेऊन येतोय “लाखांची गोष्ट” 

ऑनलाईन टीम /  पुणे :

सामान्यज्ञानावर आधारीत प्रश्नमंजुषा “लाखांची गोष्ट” या राज्यस्तरीय स्पर्धात्मक कार्यक्रमाचे आयोजन शुअर वेल्थ मॅनेजमेंट एल एल पी यांच्या तर्फे मार्च महिन्यापासून करण्यात येणार असून पुणे , ठाणे , मुम्बई , नाशिक , औरंगाबाद तसेच महाराष्ट्रातील इतर  शहरांमधून हा स्पर्धात्मक कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. लाखांची गोष्ट या राज्यस्तरीय स्पर्धात्मक कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आजचे आघाडीचे लोकप्रिय अभिनेते  सुबोध भावे करणार आहेत. या वेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदे मध्ये स्पर्धेची सविस्तर माहिती  आयोजिका अनघा मोडक, सुबोध भावे आणि  लेखक दिग्दर्शक मिलिंद शिंत्रे यांनी  दिली.

सामान्य ज्ञानाच्या आधारावर सर्वसामान्य जनता तसेच निम्न आर्थिक स्तरातील लोकांनाही लखपती होता येईल या भावनेतून हा कार्यक्रम श्रीहरी धर्माधिकारी आणि अनघा मोडक यांनी आयोजित केला आहे. हा कार्यक्रम मराठी भाषेत सादर होणार असून विविध भेटवस्तू आणि विविध रोख रकमांचा बक्षिसांमधे समावेश असलेला,  लाखांची गोष्ट हा रंगमंचावरील पहिलाच कार्यक्रम आहे ! रंगमंचावर यापूर्वी असा कार्यक्रम कुठेही झालेला नाही. या कार्यक्रमातील सर्वोच्च पारितोषक २५ लाख रुपयांचे असून, प्रत्येक कार्यक्रमात ते प्रत्येक प्रेक्षकाला मिळवता येण्याची संधी आहे. 
अनघा मोडक म्हणाल्या, “या कार्यक्रमात प्रश्न मराठी आणि इंग्रजी या दोन भाषेतून प्रेक्षकांपर्यंत पोचतील. त्यामुळे इतर भाषकही सहभागी होवू शकतील. प्रयोग जरी महाराष्ट्रातच होणार असले, तरी संपूर्ण भारतातून कुठूनही स्पर्धक या प्रयोगासाठी येऊ शकतो. निम्न आर्थिक स्तरातील लोकांसुद्धा स्पर्धेत भाग घेता यावा म्हणून बाहेर गावाहून येणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला प्रवासाचे  भाडे दिले जाईल. प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि तिचे सर्व नियम, अटी आणि पूर्ण रूपरेषा कळण्यासाठी www.lakhanchigoshta.com या संकेतस्थळाला भेट द्यावी याच संकेतस्थळावर ऑनलाइन नाव नोंदणी चालू झाली असून १८ वर्षे पूर्ण असलेल्या व्यक्तीस स्पर्धेत सहभागी होता येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.