|Sunday, January 26, 2020
You are here: Home » Top News » डबे सोडून एक्स्प्रेसचे इंजिन पुढे धावले !

डबे सोडून एक्स्प्रेसचे इंजिन पुढे धावले ! 

ऑनलाईन टीम / औरंगाबाद :

औरंगाबादमध्ये शनिवारी सकाळी मोठा रेल्वे अपघात टळला आहे. कपलिंग तुटल्याने सचखंड एक्स्प्रेसचे इंजिन डबे सोडून काही अंतर पुढे धावले. एक्स्प्रेसचे डबे रेल्वे रुळांवरून घसरले असते तर मोठी दुर्घटना घडली असती. मात्र, सुदैवाने ती घटना टळली.

सचखंड एक्स्प्रेस अमृतसरहून नांदेडकडे जात होती. सकाळी सव्वा अकराच्या सुमारास औरंगाबादजवळ इंजिन आणि डब्यांचे कपलिंग तुटले. त्यामुळे डबे मागे सोडून इंजिन काही अंतर पुढे धावले. नेमके काय झाले हे समजू न शकल्याने काही वेळ प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. अखेर थोडय़ाच वेळात रेल्वेचे इंजिन पुन्हा मागे आणून एक्स्प्रेसच्या डब्यांना जोडण्यात आले.

Related posts: