|Sunday, August 18, 2019
You are here: Home » Top News » खंडणीसाठी माजी नगरसेवकाला गोळय़ा घालण्याची धमकी

खंडणीसाठी माजी नगरसेवकाला गोळय़ा घालण्याची धमकी 

ऑनलाईन टीम / पिंपरी :

माजी नगरसेवक ईश्वर बापूराव ठोंबरे यांच्याकडे एक लाखाच्या खंडणीची एकाने मागणी केली. खंडणीची रक्कम बँकेत जमा न केल्यास गोळय़ा घालण्याची धमकी दिली. या प्रकरणी ईश्वर ठोंबरे यांनी निगडी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली असून अज्ञात व्यकतीविरोधात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्यालेल्या माहितीनुसार, ईश्वर ठोंबरे (बजाज ऑटो कॉलनी, आकुर्डी) यांना त्यांच्या मोबाईलवर अज्ञाताने मेसेज पाठवला. पाच दिवसाच्या आत एक लाख रुपये सांगितलेल्या बँक खात्यावर जमा कर,नाही तर मरशील, धनकुडे साहेबांची ऑर्डर आहे. असा धमकीचा इशारा देणारा मेसेज ठोंबरे यांना पाठविण्यात आला. या मेसेजमध्ये बँक खातेक्रमांकही देण्यात आला होता. सोमनाथ भगवान जाधव या नावाने हा मेसेज पाठवला होता. काही कालावधीनंतर दुसऱयांदा अनोळखी व्यकतीचा मोबाईलवर मेसेज आला. दिलेल्या बँक खात्यात लवकर रक्कम जमा कर, नाहीतर गोळय़ाच घालतो. असे त्या मेसेजमध्ये नमूद केले होते. एक लाखाच्या खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याप्रकरणी ठोंबरे यांनी पोलिसांकडे फिर्याद नोंदवली असून निगडी पोलीस अधिक तपास करत आहेत.