|Monday, August 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » पंतप्रधान मोदी आज जम्मू काश्मीर दौऱयावर

पंतप्रधान मोदी आज जम्मू काश्मीर दौऱयावर 

दोन एम्स रुग्णालयांचे भूमिपूजन

वृत्तसंस्था / जम्मू 

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवार 3 रोजी जम्मू काश्मीर दौऱयावर जात असून विजयपूर आणि अवंतीपूरा येथे नवीन एम्स रुग्णालयांची पायाभरणी करणार आहेत. याशिवाय विविध विकास योजनांचेही भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहेत. याच दरम्यान, ते प्रसिद्ध दललेक परिसरालाही भेट देणार आहेत.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या दौऱयाच्या पार्श्वभूमीवर फुटीरतावादी नेत्यांनी बंदचे आणि कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केल्यामुळे हुरियत कान्फरन्सचा नेता मीरवाईज उमर फारुक उमर याला नजरकैदेत ठेवण्यात आले आहेत. तर कोणत्याही प्रकारचा हिंसाचार उफाळून येऊ नये म्हणून पाचस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

या दौऱयामध्ये पंतप्रधान मोदी जम्मू, श्रीनगर आणि लेह येथे जाणार आहेत. विजयपूर आणि पुलवामा जिल्हय़ातील अवंतीपुरा येथे एम्सचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या दोन्ही उपक्रमांना मंत्रिमंडळाने नुकतीच मंजुरी दिली आहे. याचा फायदा जम्मूमधील ग्रामीण भागाला होणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. या दौऱयामध्ये पंतप्रधान लडाख विद्यापिठाचीही स्थापना करणार असून लडाख भागातील ही पहिलीच विद्यापीठ ठरले आहेत. लेह, कारगिल, नुब्रा, झन्स्कार, द्रास खलत्सी या भागामध्ये या विद्यापिठाची महाविद्यालये असतील. याशिवाय राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानमधील अनेक उपक्रमांचेही ते डिजिटली उद्घाटन करतील. 54 डिग्री कॉलेजस, 11 व्यावसायिक महाविद्याले आणि एक महिला विश्वाविद्यालययाचीही स्थापना करण्यात येणार आहे. जम्मू आणि काश्मीर विभागातील सौभाग्य योजनेतून पूर्णत्वास नेण्यात आलेल्या विद्युतीकरणाचाही घोषणा करतील. किश्तवार येथील 624 मेगावॅटच्या किरु जलविद्युत प्रकल्पाचे भूमिपूजन करतील. चिनाब नदीवर हे केंद्र उभारले आहे.

दरम्यान, या दौऱयापूर्वी घातपाताची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केल्याने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मोदी यांच्याकरता पाचस्तरीय सुरक्षा यंत्रणा विजयपूर आणि अवंतीपुरा भागात तैनात केली आहे.