|Sunday, March 29, 2020
You are here: Home » मनोरंजन » दहावीच्या परीक्षेचे टेन्शन दूर करणार ‘10 वी’

दहावीच्या परीक्षेचे टेन्शन दूर करणार ‘10 वी’ 

10 वी म्हणजे आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा. ती परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर शिक्षित असा शिक्का बसतो. सध्या दहावीची परीक्षा ही विद्यार्थ्यांपासून पालकांपर्यंत अत्यंत महत्त्वाची पायरी समजली जाते. दहावीचे टेन्शन असल्यामुळे मुलांना सतत अभ्यासाला लावणारे पालक सर्वत्र पाहावयास मिळतात. खरेतर ही परीक्षा महत्त्वाची असली तरी त्यासोबत येणारा मानसिक तणाव पालक आणि पाल्यांच्या मनावर आघात करून जातो हे कितपत योग्य आहे? अशाच मुलांच्या आणि पालकांच्या मनोस्थितीवर भाष्य करणारा ‘10 वी’ हा मराठी चित्रपट 8 फेब्रुवारीला चित्रपटगृहात दाखल होतो आहे. 

 जरी दहावीची परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यातील मैलाचा दगड असला तरीही त्यावेळी येणाऱया टेंशन्सचा व त्यातून येणाऱया नैराश्येचा कसा सामना करता येऊ शकेल यावर ‘10 वी’ या चित्रपटातून प्रकाशझोत टाकला आहे. चित्रपटाची कथा, पटकथा-संवाद मयूर राऊत आणि पियुष राऊत यांचे असून या दोघांनीही दिग्दर्शनाची जबाबदारी उचलली आहे. निर्माते सुधीर जाधव यांनी हा सिनेमा प्रस्तुत केला आहे. देवेंद्र अरोडा हे सहनिर्मात्याच्या भूमिकेत आहेत. रविराज पवार व आकाश पवार यांच्या गीतांवर संगीतसाज चढविला आहे अरुण चिल्लारा, आकाश पवार आणि ऐश्वर्य मालगावे यांनी. चित्रपटाच्या पोस्टरवर कलाकारांचे चेहरे लपविले आहेत. सर्वच कलाकारांची नावे गुलदस्त्यात ठेवून निर्मात्यांनी प्रेक्षकांची उत्सुकता ताणली, हे निश्चितच.

Related posts: