|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » गोविंद पानसरे विद्यालयात आठवडी बाजार उत्साहात

गोविंद पानसरे विद्यालयात आठवडी बाजार उत्साहात 

कोल्हापूर

मनपा. कॉमेंड गोविंद पानसरे विद्यालय या शाळेत नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत ‘आठवडी बाजार’ व ‘हळदी कुंकू’ कार्यक्रम संपन्न झाला.

प्रथम महिलांना तिळगूळ घ्या, गोड गोड बोला म्हणत स्नेहभावाने हळदी-कुंकू दिले. त्यानंतर मुलांनी मैदानावर विविध वस्तूंचे स्टॉल मांडले. वस्तूंची विक्री करुन व्यावहारिक ज्ञानाची माहिती घेतली. भाजीपाला, खाद्यपदार्थ, फळे, खेळणी, सजावट, कलाकुसरीच्या वस्तूंचे स्टॉल मांडण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन द्वारकानाथ  भोसले, सौ. सुनिता निंबाळकर व सौ. विजया चव्हाण यांचे हस्ते झाले.

सौ. आशालता कांजर (मुख्याध्यापक), अजित कानकेकर, सीमा रावळ, वर्षा मुरकुटे, दिपक कुंभार, तानाजी दराडे, सुरेश केसरे, लक्ष्मण पोवार यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.