|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » Top News » अभिनेत्री शिल्पा शिंदेची राजकारणात एन्ट्री

अभिनेत्री शिल्पा शिंदेची राजकारणात एन्ट्री 

ऑनलाईन टीम / मुंबई :

‘बिग बॉस’च्या दहाव्या पर्वाची विजेती ठरलेली मराठमोळी अभिनेत्री शिल्पा शिंदेने राजकारणात पाऊल ठेवले आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उपस्थितीत शिल्पा शिंदेने काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

‘भाभी जी घर पर है’ या मालिकेतील अंगुरी भाभीच्या व्यक्तिरेखेमुळे शिल्पा शिंदे प्रसिद्धीच्या झोतात आली होती. त्यानंतर बिग बॉसच्या दहाव्या पर्वात प्रवेश केल्यावर ती अनेक प्रेक्षकांची फेवरेट ठरली होती. बिग बॉसच्या घरातील हीना खानसोबतच्या तुंबळ युद्धात तिचे पारडे कायम जड राहिले होते. त्यानंतर बिग बॉसच्या विजेतेपदामुळे तिच्या लोकप्रियतेवर शिक्कामोर्तब झाले. शिल्पा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस प्रवेश करत असल्यामुळे ती निवडणुकांच्या रिंगणात उतरणार, की स्टार प्रचारक होणार, हे येत्या काळात समजेल. मात्र काँग्रेस तिच्या लोकप्रियतेचा लाभ करुन घेणार, यात शंका नाही.