|Sunday, December 15, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

विचार बदला, नशीब बदलेल

बुध. दि. 6 ते 12 फेब्रुवारी 2019

ग्रह, तारे, नक्षत्र व वार यांच्या संयोगानुसार रोज काही ना काही शुभाशुभ योग होत असतात. अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी त्यांचा वापर करावा. दि. 6 सौभाग्य योग, मित्र जोडा, दि. 7 वज्र व मुदगर योग, कर्जफेड व भांडणतंटे, दि. 8 बुधाचा कुंभेत प्रवेश, श्री. गणेश जयंती, सर्व कार्यसिद्धीसाठी गणेश पूजन, दि. 9 धुम्रयोग, गॅस, केमिकल व इतर वस्तू जपून हाताळा. दि. 10 विवाहाची बोलणी, वाटाघाटी, विवाह प्रवास, धनवृद्धी तसेच भद्रादोष, निवारण शांती यासाठी उत्तम. दि. 11 वादविवाद, मतभेद यापासून दूर रहा. अनोळखी व्यक्तींपासून जपा. दि.12 रथसप्तमी, अरुणोदयाला स्नान करून सूर्याची उपासना करावी. डोळय़ांचे विकार असतील तर या दिवसापासून रोज श्री चाक्षुषोपनिद स्तोत्र वाचण्यास प्रारंभ करावा…आम्ही लोकाशी चांगले वागूनही लोक तुसडेपणाने वागतात. त्यांना मदत करूनही आमच्या मदतीला मात्र ते येत नाहीत. काही हवे असेल तर समोर गोड बोलतात व मागून टोमणे मारत असतात. कितीही चांगले वागा, लोक आम्हाला अनुकूल नाहीत, अशा तक्रारी सतत ऐकू येत असतात. उगीच कोण कुणाशी वाईटपणा धरत नसतात. प्रत्येकाला काही ना कारणे असतातच, पण आपण जसे वागतो, तसे जग वागत असते हे लक्षात ठेवावे. लोकांना आपण सुधारू शकत नाही, पण स्वत:ला सुधारू शकतो. आपण कुणाचाही दुस्वास करायचा नाही. ज्यावेळी लोक आपल्यामागून बोलतात, जळफळतात, मत्सर करतात त्यावेळी समोर येऊन बोलण्याचे धाडस नसणारेच मागे बोलत असतात. आपण त्यांच्याकडे लक्ष देऊ नये. हा शहाणपणा असतो. तुम्हाला मनस्ताप व्हावा, तुमचे मन चलबिचल व्हावे, यासाठीच हे लोक तसे वागत असतात. पण त्याचबरोबर आपले काय चुकते हे पहाणेही तितकेच महत्त्वाचे असते. शक्मयतो कुणाच्याही मागे त्याच्याविषयी वाईट बोलू नये. कारण ‘जे कराल ते भराल’ या निसर्गनियमाप्रमाणे आपण जर कुणाविषयी बरे वाईट बोललो तर ते आपल्यावरच उलटते. शत्रू, मित्र अथवा इतर कुणीही असोत तरी जे काय असेल ते समोर बोलून समस्या निकालात काढावी, पण त्याच्या पाठीमागे त्याच्याविषयी, चुकूनही वाईट बोलू नये. अन्यथा त्याचे फार वाईट परिणाम होतात. ‘विचार बदला, नशीब बदलेल.’ अशी एक म्हण आहे. तुम्हाला तुमची सर्वांगीण प्रगती करून घ्यायची, असेल तर सर्वाविषयी चांगला भाव ठेवा. चांगल्या कार्याबद्दल एखाद्यावर मत्सराने जळण्यापेक्षा त्याचे कौतुक करण्यास शिका. ज्यावेळी तुम्ही सर्वाविषयी चांगला भाव बाळगाल, त्याच क्षणापासून तुमच्या भाग्योदयास सुरुवात होईल. कुणी शत्रूही राहणार नाहीत. शत्रू निर्माण होतात, ते आपल्याच चुकीमुळे हे लक्षात ठेवावे. हा रथसप्तमीचा संदेश आहे. त्या दिवशी सूर्याचे मिळेल ते स्तोत्र वाचा. सूर्य जसा सर्वांवर समभाव दृष्टी ठेवतो, तसे वागण्याचा प्रयत्न करा. सर्व समस्या मिटतील. रथसप्तमीला केलेले सूर्याचे पूजन घराण्यातील अनेक दोष नष्ट करते. तुमचे जे कुणी पुरोहित, भटजी असतील त्यांच्याकडून रथसप्तमीचे पूजन करून घ्या, हे पूजन व्यवस्थित झाल्यास भाग्य उजळायला वेळ लागणार नाही.

मेष

आपल्या राशीत होणारी मंगळ, हर्षल,चंद्र त्रियुती पैशाची आवक व्यवस्थित ठेवेल. पण त्याचबरोबर काही हितशत्रूचा त्रासही जाणवेल. नोकर वर्गाकडून समाधानकारक कामे होती. रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक तसेच गाडी चालविताना बरीच काळजी घ्यावी लागणार आहे. अचानक खर्चाचे प्रमाणही वाढेल. वादाचे प्रसंग मिटते घ्यावे. काही कारणास्तव पति-पत्नीत वादविवाद होण्याची शक्मयता.


वृषभ

व्यवसायात आर्थिक भरभराट सुरू होईल. योजलेल्या काही कामात अनुकूलता प्राप्त होईल. सध्या धाडसाचे कोणतेही व्यवहार करताना काळजी घ्यावी लागणार आहे. आरोग्याच्या बाबतीत न उद्भवणारे आजार निर्माण होतील. स्वत:च्या वाणीवर संयम ठेवा, अन्यथा वादविवाद वाढत जाईल. नोकरीमध्ये अधिकाऱयांशी थोडे नमते घ्या. काही आर्थिक कामासाठी कर्ज काढायचा प्रसंग आल्यास विचारपूर्वक निर्णय घ्या, अन्यथा फसवणुकीची शक्मयता आहे.


मिथुन

व्यवसाय क्षेत्रातील अडचणी कमी होतील. तसेच आर्थिक फायदाही होईल पण त्याचबरोबर व्यवहारातून वादविवाद, संघर्ष निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. लाभात हर्षल, मंगळ हा शुभयोगात असल्याने अचानक मोठय़ा धनलाभाची शक्मयता. जागेचे व्यवहार पूर्ण होतील. कुटुंबामध्ये स्वत:च्या जीवनसाथीच्या आरोग्याची काळजी घ्या. तसेच संततीला वाहन हातात देताना काळजी घ्या.


कर्क

दशमात मंगळ, हर्षल युती आहे. नोकरी, व्यवसायात चांगले बदल घडवील. जबाबदारीची कामे करावी लागतील. व्यवस्थित चाललेला नोकरी व्यवसाय बदलण्याचा विचारही कराल. माता पित्यांच्या बाबतीत सौख्यदायक वातावरण. एखाद्या अति महत्त्वाच्या व कठीण कामात यश. पण किरकोळ कारणासाठी मोठे खर्च करावे लागतील. पंधरवडय़ात महत्त्वाच्या घटना घडवील. अपेक्षा नसताना एखादी महत्त्वाची शुभवार्ता ऐकू येईल.


सिंह

मंगळ, हर्षल युती भाग्यात हा अत्यंत शुभयोग आहे. धनलाभाच्या बाबतीत अनुकूलता लाभेल व मुलाबाळांचा भाग्योदय होईल. वैवाहिक जीवनाला शुभ कलाटणी. अनेक महत्त्वाच्या कामांना गती मिळेल. भावंडांत वितंडवाद असतील तर ते कमी होतील. मालमत्तेच्या वाटण्यासंदर्भात वादावादी नोकरवर्गात काही तरी गोंधळ उडण्याची शक्मयता. मन शांत ठेवून वागणे आवश्यक.


कन्या

अष्टमस्थानी हर्षल, मंगळ युती आहे. हा स्फोटक योग असतो. अग्नि व वीजेची उपकरणे जपून हाताळा. व्यवसायात ताणतणावाचे वातावरण दिसून आल्यास रथसप्तमीचे व्रत करा. इतरांना विश्वासाने दिलेली कागदपत्रे अडकून पडण्याची शक्मयता. महत्त्वाची कागदपत्रे सांभाळावीत. आपले वाहन या काळात कुणालाही चुकूनही देऊ नका. त्यांच्या चुकीने काही गोंधळ झाल्यास निस्तरणे अवघड होईल.


तुळ

सप्तमात हर्षल, मंगळ युती आहे. वैवाहिक जीवनात चमत्कारीक घटना. अचानक लग्न ठरणे, अथवा रद्द होणे असे प्रकार घडू शकतात. चुकीचे संदेश नको ते मेसेजेस यापासून दूर रहा व विश्वासही ठेवू नका. फसवणूक, दगा फटका असे प्रकार घडतील. मोठमोठय़ा कंपन्यांचे शेअर्सचे व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. कोर्टमॅटरची प्रकरणे असतील तर मुदत घ्या.


वृश्चिक

हर्षल, मंगळ युती आहे. नोकरीत अचानक उच्चपद मिळेल. शेती बागायती असेल तर लाभदायक. क्षेत्रात उत्तम यश, दूर प्रवासाचे योग. अचानक मोठे खर्च निघतील. कोणतेही व्यवहार जपून करावेत. डोळय़ांची काळजी घ्यावी, रहात्या जागेत बदल होईल. चेकवर सही करताना काळजी घ्यावी. कुठेही अडकणार नाही यासाठी जपावे. अती विचारापासून दूर रहावे, आपले कोण परके कोण हे ओळखून वागा.


धनु

पंचमात हर्षल, मंगळ युती आहे. जगावेगळे काही तरी करून दाखवाल. कौटुंबिक सौख्यात अडचणी येतील. व्यापार व शेतीवाडी यात फायदा होईल. प्रेमप्रकरणात असाल तर सावधगिरी बाळगा. दगा फटका होण्याची शक्मयता. काही गंभीर प्रसंग आल्यास रथसप्तमीचे व्रत करा. मार्ग निघेल. सर्व तऱहेच्या अपघात व दुर्घटनेपासून जपावे बोलण्यात, वागण्यात जरा मार्दव ठेवा.


मकर

चतुर्थात हर्षल, मंगळ स्फोटक युती आहे. वास्तुविषयक पाडापाडी अथवा दुरुस्तीविषयक कामे शक्मयतो काढू नका. वाहन, अपघात होण्याची शक्मयता आहे.काळजी घ्या. कुठेही कठोर बोलण्याने संबंध बिघडू शकतात, याची जाण असू द्यावी. विवाहितांनी गैरसमजापासून दूर रहावे. मालक व नोकर वर्गाने प्रतिमा डागाळणार नाही, याकडे लक्ष द्यावे. हा योग अचानक संकटे निर्माण करणारा आहे. सर्व बाबतीत सावध राहूनच कामे करावीत.


कुंभ

पराक्रमात मंगळ, हर्षल युती  आहे. हा योग काही बाबतीत चांगला आहे जे काम हाती घ्याल त्यात यश. गायन, विवाह संस्था यात उत्तम यश मिळेल. नावलौकिक होण्याचे योग. काही बाबतीत भावनावश होऊन नैतिकता बिघडविणारे ग्रहमान. अध्यात्माकडे विशेष लक्ष दिल्यास मन ताब्यात राहील. भावंडांच्या बाबतीत काळजी घ्या. वादावादी, मतभेद, गैरसमज यांना थारा देऊ नका. संसार सौख्यात अडचणी येतील. सांभाळावे. गुरु शुभ आहे. नोकरी व्यवसायात काही तरी शुभघटना घडण्याची शक्मयता.


मीन

धनस्थानी हर्षल, मंगळ युती असल्याने सांपत्तिक घोटाळे, बँका बुडणे, दिवाळे वाजणे, नेत्रदोष, खाण्यापिण्यातून बाधा, कामाचा ताण वाढेल, न पेलवणाऱया जबाबदाऱया पडतील. सरकारी कामात घोटाळे, अवैध मार्गाकडे मन वळण्याची शक्मयता. विषारी व हिंस्त्र प्राणी श्वापदे कुत्री यापासून त्रास होईल. सासरच्या व्यक्तीकडून मानहानी, वडिलोपार्जित मालमत्तेच्या बाबतीत अडथळे येतील.

Related posts: