|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » Top News » मुख्यमंत्र्यांनी अण्णांच्या पाया पडून निवडणुकापर्यंत वेळ काढून घेतली : जयंत पाटील

मुख्यमंत्र्यांनी अण्णांच्या पाया पडून निवडणुकापर्यंत वेळ काढून घेतली : जयंत पाटील 

ऑनलाईन टीम / नागपूर : 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णा हजारेंचे पाया पडून विधानसभा निवडणूक होईपर्यंत वेळ काढून घेतली, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. काल उपोषणस्थळी जाऊन मुख्यमंत्र्यांनी अण्णा हजारेंच्या मागण्या पूर्ण करण्याचे अश्वासन दिले होते. त्यानंतर अण्णेंनी उपोषण मागे घेतले होते.

लोकपाल नियुक्ती आणि शेतकऱयांच्या शेतमालाला योग्य भाव यांसारख्या अनेक मागण्यासाठी अण्णा हजारे राळेगणसिद्धी येथे उपोषणाला बसले होते. उपोषणाच्या सातव्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर अण्णांनी उपोषण मागे घेतले. त्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांनी अण्णांचे पाया पडून निवडणुकांपर्यंत वेळ काढून घेतली असल्याचा आरोप केला आहे. त्यासोबतच जयंत पाटील यांनी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या महाआघाडीत सामिल होण्याबाबतही खुलासा केला. प्रकाश आंबेडकर आमच्याबद्दल काहीही बोलेले तरी ते आमच्यासाठी महत्वाचे नाही. भाजप-शिवसेनेला आगामी निवडणुकीत पराभूत करण्यासाठी आंबेडकरी मते एकत्र यावी, असा आमचा प्रयत्न असल्याचे जयंत पाटील म्हणाले. प्रकाश आंबेडकरांसोबत महाआघाडीबाबत चर्चा सुरु आहे. काही मुद्यांवर एकमत झाल्याचेही जयंत पाटील म्हणाले.