|Saturday, March 28, 2020
You are here: Home » Top News » वाड्रा ईडीसमोर हजर

वाड्रा ईडीसमोर हजर 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

मनी लाँडरिंग प्रकरणी चौकशीसाठी काँग्रेस नेता प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा आज दिल्लीतील अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात हजर झाले. त्यांच्यासोबत प्रियांकाही होत्या. मात्र, त्या कार्यालयाच्या गेटवरून मागे परतल्या.

 

मनी लाँडरिंग प्रकरणी दिल्लीतील एका न्यायालयाने वाड्रा यांना 16 फेब्रुवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे. त्याचवेळी वाड्रा यांनी चौकशीस सहकार्य करावे व ईडीच्या कार्यालयात 6 फेब्रुवारीला हजर व्हावे, असे निर्देश कोर्टाने दिले होते. त्यानुसारच वाड्रा ईडीच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. वाड्रा दुपारी 3 वाजून 47 मिनिटांनी मध्य दिल्लीतील जामनगर हाऊस येथील ईडी कार्यालयात पोहोचले. ते पोहोचण्याआधीच त्यांच्या वकिलांची टीम कार्यालयात दाखल झाली होती. एखाद्या तपास यंत्रणेपुढे हजर होण्याची वाड्रा यांची ही पहिलीच वेळ आहे. मनी लाँडरिंगचे हे प्रकरण लंडनमधील एका मालमत्तेच्या खरेदीशी संबंधित आहे. लंडनमधील ’12, ब्रायनस्टन स्क्वेअर’ येथे 17 कोटी रुपये मोजून फ्लॅट विकत घेताना कथित मनी लाँडरिंग झाल्याचा आणि हा फ्लॅट वाड्रा यांच्या मालकीचा असल्याचा ईडीचा दावा आहे. वाड्रा आणि त्यांच्या सहकाऱयांना 2009 मध्ये झालेल्या पेट्रोलियम डीलमध्येही पैसे मिळाल्याचा दावा ईडीने कोर्टात केलेला आहे.

 

Related posts: