|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » विराट चषक क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ

विराट चषक क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ 

बेळगाव / क्रीडा प्रतिनिधी :

महाद्वाररोड येथील पॅरी स्पोर्ट्स क्लब आयोजित संभाजी उद्यान मैदानात गुरूवारपासून विराट चषक 2019 या मर्यादित षटकांच्या टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ झाला.

या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून कपिल भोसले, नगरसेविका वैशाली हुलजी, रविंद्र हुलजी, राजीव भातकांडे, राहुल मुचंडी, माजी नगरसेवक सुनिल बाळेकुंद्री, अभिजित चव्हाण, दौलत साळुंखे, रविकुमार कोकीतकर, गजानन देवरमणी आदी मान्यवरांच्या हस्ते क्रिकेट यष्टीला पुष्पहार अर्पण करून उद्घाटन करण्यात आले.