|Sunday, September 22, 2019
You are here: Home » Top News » मेगाभरतीत 4 हजार जागांसाठी 8 लाख अर्ज

मेगाभरतीत 4 हजार जागांसाठी 8 लाख अर्ज 

ऑनलाईन टीम / मुंबई :

देशात बेरोजगारीवर राजकारण तापत असताना राज्य सरकारने घोषणा केलेल्या मेगा भरतीच्या प्रक्रियेला अखेर सुरुवात झाली आहे. मात्र याला खरंच मेगा भरती म्हणावे का? असा प्रश्न निर्माण होत आहे. याचे कारण म्हणजे गेल्या दोन महिन्यात प्रसिद्ध झालेल्या चार हजार पदांसाठी तब्बल साडे सात लाख अर्जदारांनी नोंदणी केल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाच्या सूत्रांकडून समोर आली आहे.

  सरकारची 72 हजार जागांची पदभरती दोन टप्प्यात करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार गेल्या दोन महिन्यात विविध आस्थापनांच्या पदांसाठी जाहिराती प्रसिद्ध झाल्या. ’वर्ग क आणि ड’ च्या या सरकारी नोकऱयांसाठी तरुणांकडून मिळणारा प्रतिसाद थक्क करणारा आहे. कारण आतापर्यंत निघालेल्या एकूण 4410 पदांसाठी तब्बल 7.88 लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. याचा अर्थ 1 पदासाठी सरासरी 178 अर्जदार स्पर्धा करत आहेत.