|Monday, January 20, 2020
You are here: Home » क्रिडा » चेन्नई सिटीची इंडियन ऍरोसवर मात

चेन्नई सिटीची इंडियन ऍरोसवर मात 

वृत्तसंस्था / भुवनेश्वर

आय लीग फुटबॉल स्पर्धेच्या गुणतक्यात चेन्नई सिटी संघाने पुन्हा पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. शुक्रवारी येथे झालेल्या या स्पर्धेतील 15 व्या फेरीतील सामन्यात चेन्नई सिटी एफसी संघाने इंडियन ऍरोसचा 2-0 अशा गोलफरकाने पराभव केला.

या सामन्यात खेळाच्या उत्तरार्धात चेन्नई सिटीने हे दोन गोल नोंदविले. 71 व्या मिनिटाला सँड्रोने फ्री किकवर चेन्नई सिटीचे खाते उघडले. सामना संपण्यास 2 मिनिटे बाकी असताना बदली खेळाडू एन. विजयने चेन्नई सिटीचा दुसरा आणि शेवटचा गोल नोंदवून इंडियन ऍरोसचे आव्हान संपुष्टात आणले. या विजयामुळे चेन्नई सिटी संघाने स्पर्धेच्या गुणतक्यात 33 गुणासह दुसरे स्थान मिळविले आहे. रियल काश्मीर 32 गुणासह दुसऱया स्थानावर आहे.

Related posts: