|Sunday, March 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » श्रीया रावराणे यांचा पतीकडूनच घातपात

श्रीया रावराणे यांचा पतीकडूनच घातपात 

माहेरच्या कुटुंबियांचा आरोप, पतीवर अनैतिक संबंधांचा ठपका 

चिपळूण

रामपूर सरपंच श्रीया रावराणे हिच्या पतीचे अन्य महिलेशी अनैतिक संबंध होते, त्यात अडथळा नको म्हणून पती धनंजय रावराणे यानेच श्रीयाचा घातपात केल्याचा आरोप माहेरच्या मंडळींनी केला आहे. मुख्यमंत्र्यांसह पोलीस यंत्रणेला याबाबतचे निवेदन देऊन सखोल चौकशची मागणी केली असल्याचे कुटुंबीयांनी  पत्रकार परिषदेत सांगितले.

दोनच दिवसांपुर्वी श्रीया रावराणे यांचा मृत्यू झाला असून त्यांनी विषारी द्रव्य घेऊन आत्महत्या केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. मात्र श्रीया यांच्या माहेरचे नातेवाईक सुरेश साळवी, गजानन साळवी, मनोहर साळवी, अजित साळवी, गणेश साळवी, अनिल साळवी, प्रसाद साळवी, बहीण पूजा साळवी, मामा यशवंत साळवी, प्रविण साळवी, सदानंद साळवी, प्रभाकर साळवी, भाऊ सौरभ साळवी, आदींनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत ही आत्महत्या नसून घातपातच असल्याचा आरोप केला आहे.

याबाबत माहिती देताना साळवी कुटुंबिय म्हणाले की, श्रीयाला पतीकडून त्रास होत होता. त्यांचे सतत भांडण होत असे. तिच्या वाढ†िदवसादिवशी बहिणीने केक कापण्यासाठी आपल्याकडे बोलावले होते. यावेळी फोनवर बोलताना श्रीयाने  माझ्या पतीने वाढदिवसाच्या साध्या शुभेच्छाही दिल्या नसल्याचे सांगितले होते. त्याच रात्री तिचा मृत्यू झाला. श्रीया ही धीट, कणखर होती. त्यामुळे तिने आत्महत्या करणे शक्यच नसल्याचे साळवी यांनी सांगितले.

नोव्हेंबर महिन्यात श्रीयाचा पती धनंजयने कल्याण येथील एका महिलेच्या भागीदारीतून मार्गताम्हाने येथे व्यवसाय सुरु केला. त्यासाठी तिने 25 लाख रुपये  दिले होते. या व्यावसायिक संबधातूनच दोघांमध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले. याची माहिती श्रीयाला मिळाल्यावर त्यांच्यात वाद सुरू झाले. श्रीयाचाही प्रेमविवाह असल्याने व तब्बल सोळा वर्षांच्या वैवाहीक जीवनामुळे हे नाते तुटू नये यासाठी तिचा प्रयत्न होता. तसेच आपल्या मुलाच्या भवितव्याचा विचारही तिला सतावत होता. मात्र धनंजयला ती अडचण वाटत असल्याने वाढदिवसाच्या रात्रीच तिला  विष पाजल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला.

ही घटना घडण्याच्या तीन दिवस आधी ती जेवलीही नव्हती. एवढेच नव्हे तर हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावरही केवळ तिचा रक्तदाब कमी झाल्याचे सांगण्यात आले. अखेरच्या टप्प्यात खरी माहिती देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.  धनंजयने अनैतिक संबंधातूनच हे कृत्य केल्याचा आमचा संशय आहे.  मुंबईतील म†िहलेबरोबरचे त्याचे फोटो व मेसेजही आमच्याकडे असून ते पोलिसांना देणार आहोत. त्यामुळे श्रीयाच्या मृत्यूला जबाबदार पतीवर कडक कारवाई करण्याची मागणी साळवी कुटुंबियांनी केली.

राजकीय दबाव

श्रीयाच्या मृत्यूनंतर आमचे सांत्वन करण्याऐवजी काही राजकीय पुढारी हा विषय आता वाढवू नका असे आम्हाला सांगत होते. तसेच डॉक्टरांची भूमिकाही संशयास्पद असून त्या राजकारण्यांची नावे आम्ही लवकरच जाहीर करू, असेही त्यांनी सांगितले.

Related posts: