|Sunday, September 22, 2019
You are here: Home » मनोरंजन » ‘साऊथ’मध्ये झळकणार भाग्यश्री

‘साऊथ’मध्ये झळकणार भाग्यश्री 

मराठीच्या छोटय़ा पडद्यावरून थेट ‘काय रे रास्कला’ या बिग बॅनर सिनेमातून सिनेसफष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री भाग्यश्री मोटे आता थेट साऊथच्या चित्रपटात झळकणार आहे. तसेच लवकरच ती बॉलिवूडमध्येही पदार्पण करणार असल्याचे समजते. ‘चिकती गदीलो चिताकोटुडू’ चित्रपटात मित्रमंडळी फिरण्यासाठी एका ठिकाणी जातात. ते जेथे वास्तव्यास थांबतात तेथे भूत असते आणि मग त्यांना कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो, यावर आधारित या चित्रपटाची कथा आहे. माझे तेलगूमध्ये पदार्पण असलेला चित्रपट ‘चिकती गदीलो चिताकोटुडू’चा टीझर प्रदर्शित झाला आहे, अशी पोस्ट भाग्यश्रीने सोशल मीडियावर टाकत साऊथमध्ये झळकणार असल्याची बातमी दिली.