|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » मनोरंजन » .डॉ. आनंदी जोशी यांचा ‘जीवनप्रवास’ पडद्यावर

.डॉ. आनंदी जोशी यांचा ‘जीवनप्रवास’ पडद्यावर 

प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठिशी एक स्त्राr असते, हे विधान काही आपल्यासाठी नवीन नाही. पण प्रत्येक यशस्वी स्त्राrच्या सोबतीने असतो तिला प्रोत्साहन देणारा तो. अशाच एका ध्येयवेडय़ा जोडप्याची गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आनंदी आणि गोपाळ असेच एक जोडपे. त्यांच्या प्रेरणादायी जीवन संघर्षावर आधारित समीर विद्वांस दिग्दर्शित आणि झी स्टुडिओज् प्रस्तुत ‘आनंदी गोपाळ’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 15 फेब्रुवारीला आनंदी आणि गोपाळ यांचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे. नुकताच या चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा संपन्न झाला.

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून वेळप्रसंगी समाजाचा रोष पत्कारून गोपाळरावांच्या सोबतीने आनंदीबाई फक्त शिकल्याच नाहीत तर भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान त्यांनी मिळवला. त्यांचा हाच ध्येयवेडा प्रवास ‘आनंदी गोपाळ’मध्ये पाहायला मिळणार आहे.