|Monday, August 26, 2019
You are here: Home » मनोरंजन » पुनर्जन्माची थरारक प्रेमकथा ‘भेद’

पुनर्जन्माची थरारक प्रेमकथा ‘भेद’ 

प्रेमाच्या आड जात, धर्म, पैसा, संपत्ती येत नाही, प्रेमाच्या मार्गात कितीही अडथळे आले तरी प्रेम यशस्वी होतेच. अशीच एक जगावेगळी पुनर्जन्माची आणि प्रेमाच्या ध्यासाची खिळवून टाकणारी गोष्ट सांगणारा ‘भेद’ हा संगीतमय चित्रपट 15 फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. सुचिता जाचक यांच्या ग्रीन चिली मुव्ही इंटरनॅशनल निर्मित भेदचे दिग्दर्शन प्रमोद शिरभाते यांचे आहे. चित्रपटात अजित गाडे, श्लेषा मिश्रा, अभिषेक चौहान आणि डॉ. राजेश बक्षी मुख्य भूमिकेत आहेत.

महाराष्ट्राच्या मातीतल्या अस्सलपणा असलेली दोन पिढय़ांमध्ये रंगणारी ही प्रेमाची गोष्ट, प्रत्येकाला आपलीशी वाटणारी आहे. ही प्रेमाची गोष्ट संगीतमय असून चित्रपटात सहा गाणी आहेत. ही सहा गाणी लाईव्ह ऑन म्युझिक या मराठी युटय़ूब चॅनलवर दिसणार आहेत. ‘कोण शिटय़ा वाजवतो’ हे गाणे विशेष लोकप्रिय ठरले असून पूनम पांडे या गाण्याच्या निमित्ताने मराठीत पदार्पण करत आहे.