|Thursday, November 14, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » थंडीच्या कडाक्यामुळे नुकसान

थंडीच्या कडाक्यामुळे नुकसान 

प्रतिनिधी/ महाबळेश्वर

महाबळेश्वरचा प्रसिद्ध वेण्णा तलाव ते लिंगमाळा परिसरात शनिवारी झालेल्या प्रचंड  हिमकण व कडाक्याच्या थंडीमुळे शेकडो पर्यटक व स्थानिकांनी भेटी देवून कौतुक केले तसेच त्याचे चित्रणही केले. या भागातील मळेधारक शेतकरी तसेच नर्सरीच्या बागा करणाऱया मळेधारकांच्या या अचानक आलेल्या नैसार्गिक आपत्तीमुळे तोंडचे पाणीच पळाले असून त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. तर तोडण्यासाठी तयार झालेली शेकडो किलो स्ट्रॉबेरीची फळे, हातातोंडाला आलेले बटाटा, वांगी यांचे नुकसान झालेले दिसून येत आहे.    

   गेले आठवडाभर थंडीने संपूर्ण देशावर अधिराज्य केले होते. त्याचाच परिणाम महाबळेश्वर मध्येही पहावयास मिळत होता. हे पर्यटनस्थळही आठवडाभर थंडीने गारठले होते. मात्र शुक्रवारी कहरच झाला. महाबळेश्वर परिसरात अचानक थंडीचा जोर वाढला आणि त्याने विक्रमच केला. येथील प्रसिद्ध वेण्णा तलाव ते लिंगमाळा परिसरातील निच्चांकी तापमान 0 ते उणे 2 पर्यंत गेले होते. पडलेल्या थंडीचा
प्रचंड कडाका व त्यामुळे तयार झालेले या हंगामातील सर्वात जास्त हिमकण यामुळे येथील प्रसिद्ध वेण्णा तलाव ते लिंगमाळा परिसरातील निच्चांकी तापमान 0 ते उणे 2 पर्यंत गेले होते. यामुळे याच परिसरातील स्ट्रॉबेरी मळेधारकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून कडाक्याच्या थंडीने पीक जळून व कुजून गेल्याने अक्षरशः हजारो किलो स्ट्रॉबेरीची फळे फेकून देण्याची वेळ मळेधारकांवर आली असून त्यांच्या कुटुंबावर दुखाचे सावट पसरले आहे. हीच परिस्थिती पालेभाज्या व फुल शेती करणाऱया शेतकऱयांची असून सर्व रोपे प्रचंड थंडीने जळल्याने त्यांचेही मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान तालुक्यातील नुकसानग्रस्त
शेतकऱयांनी आम्हाल ाशासनाकडून त्वरित मदत मिळावी अशी मागणी केली आहे.

    महाबळेश्वर म्हटले की स्ट्रॉबेरीची मधुर फळे हे समीकरण असून दररोज या भागातून कित्येक टन स्ट्रॉबेरी निर्यात केली जाते. अचानकच्या कडाक्यामुळे येथील प्रसिद्ध वेण्णा तलाव ते लिंगमळा परिसरासह तालुक्यातील बऱयाच भागातील स्ट्रॉबेरीच्या फळांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे मळेधारक ती पर्यटकांना देवू शकत नाहीत. ती रोगिष्ट व बेचव झाली आहेत.  यामुळे त्यांचे  लाखो रुपयांचे नुकसान झाले असून मळेधारकांनी अक्षरशः शेकडो किलो स्ट्रॉबेरी फेकून दिली. निसर्गाच्या या लहरीपणामुळे सध्या या भागातील मळेधारक हवालदिल झाला असून ऐन हातातोंडाला आलेल्या फळांचे अचानक नुकसान झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर जणू शोककळाच पसरली आहे. कडाक्यानंतर आज हे मळेधारक स्ट्रॉबेरीची फळे तोडण्यासाठी आपल्या मळ्यात गेले, तेव्हा तेथील फळांची गंभीर परिस्थिती पाहून अनेकांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. एवढी मेहनत करून, रात्रंदिवस पहारा करून गव्यापासून त्याचे रक्षण केले. मात्र, आजच्या अचानकच्या संकटामुळे तयार फळे फेकण्याची पाळी त्यांच्यावर आली.

  याहून आमचे दुर्भाग्य ते काय ? अशी व्यथा अनेक मळेधारकांनी पत्रकारांकडे व्यक्त केली. शासन अन्य पिकांना नुकसान भरपाई देते. आमचे या फळांवरच जीवन असल्याने शासनाने खास बाब म्हणून आमचा सहानुभूतीपूर्वक विचार करून तातडीची मदत करावी. अन्यथा आमच्या कुटुंबीयांवर उपासमारीची पाळी येण्याचा धोका आहे. थंडीमुळे हा संपूर्ण तोड वाया गेला आता पुन्हा नवीन रोपे लावणे व त्यांना फळे येण्यासाठी पुन्हा 1 ते 1.5 महिने थांबावे लागणार. शिवाय
एप्रिल ाम मे महिन्यात काही भागात पाण्याची कमतरता भासत असल्याने त्याचा काहीच उपयोग होणार नाही. तेव्हा शासनाने आम्हा मळेधारकांना मदत करावी. अशीच परिस्थिती याच परिसरातील अन्य शेतकऱयांची तसेच परिसरातील शोभिवंत फुल झाडांची शेती करणाऱया मळेधारकांची झाली आहे. त्याच्या मळ्यातील तूतू (मलबेरी) झाडे, जांभूळ झाडे, पेरूची झाडे थंडीमुळे जळून गेली आहेत. ती पूर्णपणे काळी पडली आहेत. वांगी, बटाटा, फारशी मिरची, कोबी, फ्लावर आदींची रोपेही जळून गेली आहेत. त्यामुळे या मळेधारकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच झेंडू, गुलाब, जरबेरीया, कर्दळ, सदाफुली, बिगोनिया आदी शोभिवंत  फुलांनी हिमकणांचे दागिने घातले होते. त्याच फुलांची आजची अवस्था अत्यंत केविलवाणी व गंभीर झाली आहे. कडक्यामुळे सर्व रोपे जळून गेली असून फुलांकडे तर बघवत नाही. या नर्सरीवाल्यांचेही लाखोंचे नुकसान झाले असून ते ही चिंतेत आहेत. शासनाने या बाबींचा गांभीर्याने विचार करून महाबळेश्वरच्या या हवालदिल झालेल्या शेतकरी कुटुंबाना खास बाब म्हणून मदत करावी अन्यथा त्यांचे जगणे कठीण होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे………

Related posts: