|Thursday, September 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कोलवाळ येथे रेती वाहतूक करणारे 9 ट्रक जप्त

कोलवाळ येथे रेती वाहतूक करणारे 9 ट्रक जप्त 

खाण अधिकारी, संयुक्त मामलेदार यांची कारवाई

प्रतिनिधी / म्हापसा

खाण विभागाच्या अधिकारी वर्गाने बार्देशचे संयुक्त मामलेदार यांच्यासोबत केलेल्या कारवाईत बेकायदेशीररित्य रेती वाहतूक करणारे 9 ट्रक कोलवाळ व करासवाडा हमरस्त्यावर जप्त केले. सकाळी 8 ते 9 या दरम्यान केलेल्या या कारवाईत हे ट्रक जप्त करण्यात आले.

दोन दिवसांपूर्वीच कामुर्ली पंचायत मंडळाने कामुर्ली गावात मोठय़ा प्रमाणात बेकायदा रेती वाहतूक होत असल्याची माहिती पत्रकार परिषदेतून दिली होती. हे प्रकार न थांबल्यास उपोषणास बसण्याचा इशाराही पंचायत मंडळातर्फे देण्यात आला होता. याबाबत कामुर्ली गावात गेल्या दोन दिवसात अद्याप कारवाई झाली नसली तर बेकायदेशीररित्या रेती वाहतूक करणारे एकूण 9 ट्रक जप्त करून अधिकारी वर्गाने बेकायदेशीर व्यवसाय करणाऱयांमध्ये खळबळ उडवून दिली आहे.

जप्त करण्यात आलेल्या 9 ट्रकांपैकी 4 ट्रक कोलवाळ हमरस्त्यावर तर 5 ट्रक करासवाडा येथे जप्त करण्यात आले. यात गोव्यातील 7 तर महाराष्ट्रातील 2 ट्रक होते. खाण अधिकारी सुधीर मांद्रेकर व संयुक्त मामलेदार संदीप गावडे यांनी ही कारवाई केली.