|Saturday, January 25, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » भाजप, काँग्रेसची लोकसभा निवडणूक तयारी सुरु

भाजप, काँग्रेसची लोकसभा निवडणूक तयारी सुरु 

काँग्रेस महिला अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांचा आरोप

प्रतिनिधी/ पणजी

एका नवविवाहीतेचा हुंडाबळी- खूनाचे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न गोवा मेडिकल कॉलेज इस्पितळात करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांनी पत्रकार परिषदेत केला.

हुंडय़ासाठी एका मुलीस प्राण गमवावे लागले असा दावा कुतिन्हो यांनी करुन सासरा गोमेकॉत कामाला असून नवरा आयआरबीत असल्यामुळेच हे प्रकरण दाबून टाकण्याचे प्रयत्न होत होते परंतु काँग्रेसने त्याचा सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे शेवटी पोलिसांना कारवाईसाठी पुढाकार घ्यावा लागला असे त्यांनी नमूद केले.

गोमेकॉच्या रहिवासी कॉलनीतच हा प्रकार घडला असून नवविवाहीतेकडे 10 लाख हुंडा मागण्यात आला. शेवटी त्या गरीब कुटुंबाने त्यांची जमीन विकून कसे बसे रु. 7 लाख दिले. परंतु त्यांचे समाधान न झाल्याने शेवटी तिचा छळ करण्यात आला. आपणास मारण्यातयेणार असल्याचे तिने भावाशी केलेले मोबाईल संभाषण भावाने रेकॉर्ड करुन ठेवले आणि पुरावा म्हणून गोमेकॉच्या डिनकडे सादर करण्यात आले, अशी माहिती कुतिन्हो यांनी केली. मृत झालेल्या त्या नवविवाहीतेचा खून करण्यात आल्याचा आरोप त्यांनी करुन शवचिकित्सा न करतास मृतदेह अंतिम संस्कारासाठी देण्यात आल्याचे निदर्शनास आणले.

या प्रकरणी गोमेकॉच्या डिनची भेट घेण्यात आली आणि आगशी पोलीस स्टेशनकडे सातत्याने पाठपुरावा करुन त्या नवविवाहीतेला न्याय देण्याची मागणी महिला काँग्रेसने लावून धरली. डिन आणि आगशी पोलिसांना या प्रकरणाची शेवटी  दखल घ्यावी लागली. त्याची पूर्ण चौकशी करुन आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी कुतिन्हो यांनी केली आहे.

Related posts: