|Thursday, September 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » ड़ॉ पावस्कर दाम्पत्याचा अटकपूर्व जामीन मंजूर

ड़ॉ पावस्कर दाम्पत्याचा अटकपूर्व जामीन मंजूर 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

ज्ञानदा पोळेकर यांच्यावरील उपचारात हलगर्जीपणा करून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल असलेल्या  ड़ॉ दिपा पावस्कर व ड़ॉ संजीव पावस्कर या दाम्पत्याचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केला आह़े जिल्हा सत्र न्यायालय व उच्च न्यायालयाकडून यापूर्वी त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होत़ा मात्र  सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला आह़े

  ज्ञानदा प्रणव पोळेकर यांना प्रसुतीनंतर झालेल्या त्रासावेळी पावस्कर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र 11 फेबुवारी 2018 रोजी त्यांचा हृदयात रक्ताच्या गुठळय़ा अडकून मृत्यू झाला होत़ा  वेळीच योग्य उपचार झाले असते तर ज्ञानदा यांचा जीव वाचला असता असा निष्कर्ष माता मृत्यू अन्वेषण समितीने काढला होता. ड़ॉ दिपा पावस्कर व डॉ. संजीव पावस्कर  रूग्णालयात नसताना त्यांनी पोळेकर यांना आपल्या रूग्णालयात दाखल करून घेतले होत़े त्याचप्रमाण पोळेकर यांना त्रास होत असताना देखील केवळ फोनवर नर्सला सांगून त्यांच्यावर उपचार करण्यासंबंधी सूचना दिल्या होत्य़ा या सर्व प्रकारात हॉस्पीटलचा निष्काळजीपणाच दिसून आल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता.  ज्ञानदा यांना प्रचंड त्रास होत असतानाही त्यांना केवळ डोकेदुखीची गोळी देण्यात आली, नेमके उपचार झालेच नाही अशी धक्कादायक माहितीही समितीच्या चौकशीत पुढे आली होत़ी

दरम्यान ज्ञानदा पोळेकर मृत्यूप्रकरणाच्या चौकशीसाठी जिल्हा रूग्णालयामार्फत माता मृत्यू अन्वेषण समिती स्थापन करण्यात आली आहे. तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रल्हाद देवकर यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूध्द आठल्ये, स्त्राr रोग तज्ञ डॉ. सुभाष चव्हाण, डॉ. ढवळे, रक्त संक्रमण अधिकारी डॉ. पराग पाथरे, फॉरेन्सीक तज्ञ प्रकाश कुंबरे, डॉ. गिरीश करमरकर यांचा समावेश होता. या समितीने देखील पावसकर हॉस्पीटलने वेळेत योग्य उपचार न केल्यानेच ज्ञानदा यांचा मृत्यू झाला, अत्याधुनिक आयसीयु असलेल्या अन्य हॉस्पीटलमध्ये हलवले असते तर त्यांचे प्राण निश्चितच वाचले असते असा निष्कर्ष समितीने आपल्या अहवालात नोंदवला होत़ा 

वरील सर्व निष्कर्ष लक्षात घेवून शहर पोलीस ठाण्यात ड़ॉ दिपा व संजीव पावस्कर यांच्याविरूद्ध भादवि कलम 304 अन्वये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होत़ा दरम्यान आपली अटक होवू शकते हे लक्षात आल्याने पावस्कर दाम्पत्याने अटकपूर्व जामीनासाठी जिल्हा सत्र न्यायालय व त्यानंतर उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता मात्र दोन्ही ठिकाणी त्यांची निराशा झाली होत़ी मात्र आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने त्यांना †िदलासा मिळाला आह़े