|Sunday, September 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मांजरी लक्ष्मी देवीची यात्रा 15 पासून

मांजरी लक्ष्मी देवीची यात्रा 15 पासून 

वार्ताहर /   मांजरी

येथील ग्रामदेवता लक्ष्मी देवीची यात्रा 15 व 16 रोजी आयोजित करण्यात आली असून यानिमित्त विविध धार्मिक व मनोरंजन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीमंत विरेंद्रसिंहराजे शितोळे सरकार यांच्या अधिपत्याखाली भरणाऱया या यात्रेचा शुक्रवारी मुख्य दिवस आहे. याचदिवशी सायंकाळी महानैवेद्य, पहाटे लक्ष्मी देवीची मशाल मिरवणूक काढण्यात येणार आहे.

16 रोजी पहाटे वेशीत देवीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. यावेळी भाविकांकडून दंडवत, देवीची ओटी भरणे आदी कार्यक्रम पार पडणार आहेत. दुपारी 12 वाजता महानैवेद्य तर सायंकाळी 6 वाजता देवीची पाठवणी व छपरास अग्निस्पर्श देऊन यात्रेची सांगता करण्यात येणार आहे. 15 रोजी रात्री 10 वाजता मनोरंजन कार्यक्रम होणार आहेत. 16 रोजी सकाळी 10 वाजता बैलगाडी शर्यती असून यासाठी 25001, 15001, 10000, घोडा शर्यतीसाठी 5001, 3000, 2000, एक घोडा एक बैल शर्यतीसाठी 6001, 4000, 2000 अशी बक्षिसे असून याच दिवशी दुपारी निकाली कुस्ती व रात्री 10 वाजता करमणुकीचा कार्यक्रम होणार आहे.