|Sunday, March 29, 2020
You are here: Home » Top News » अपघाती मृत्यूची अफवा रैनाने फेटाळली

अपघाती मृत्यूची अफवा रैनाने फेटाळली 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भारतीय संघात पुनरागमनाच्या प्रतीक्षेत असलेला क्रिकेटपटू सुरेश रैना सध्या एका कारणामुळे त्रस्त आहे. त्याचे कारण तंदुरुस्तीचे नाही तर युट्यूबवर शेअर केलेला एक व्हिडिओ आहे. रैनाचा अपघाती मृत्यू झाल्याचे या व्हिडिओत दाखवण्यात आले. हा व्हिडिओ व्हायरल होत असल्याने रैनाने सर्वांना आवाहन करत ही अफवा असल्याचे म्हटले आहे.

   कार अपघातात माझा मृत्यू झाल्याची बोगस बातमी पसरवली जातेय. ही बोगस बातमी माझे कुटुंब आणि मित्रांसाठी डोकेदुखी बनलीय. अशा बोगस बातम्यांकडे दुर्लक्ष करा, हे माझे सर्वांना आवाहन आहे. देवाच्या कृपेने मी ठणठणीत आहे. ज्या चॅनेल्सनी ही अफावा पसरवली आहे त्यांच्यावर लवकरच कारवाई होईल, असं सुरेश रैनाने स्पष्ट केले. सुरेश रैना सध्या भारतीय संघात नाहीए. उत्तर प्रदेशच्या रणजी संघाकडून तो सामने खेळतोय. गेल्या वषी डिसेंबरमध्ये झारखंडविरोधत तो शेवटचा सामना खेळला होता. त्यात त्याने शानदार 75 धवा केल्या होत्या. तर आंतरराष्ट्रीय पातळीवर गेल्या वषी जुलैमध्ये इंग्लंडविरोधत सुरेश रैनाने शेवटचा सामना खेळला होता

 

Related posts: