|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » उद्योग » आयफोन मागणीत चीनमध्ये 20 टक्के घट

आयफोन मागणीत चीनमध्ये 20 टक्के घट 

हुआवे स्मार्टफोन  23 टक्क्यांनी नफा, शाओमीच्या मागणीत 35 टक्क्यांनी वाढ

वृत्तसंस्था/ बीजिंग

सध्या बाजारात मोबाईल कंपन्यामध्ये मोठी चढाओढ होत असल्याचे चित्र तयार झालेले आहे. त्यामुळे कमी किंमतीत जादाचे फिचर्स देण्यासाठी अनेक स्मार्टफोन निर्मिती करणाऱया कंपन्या धडपड करत असतानाचे वातावरण बाजारात तयार झाले आहे. यामध्ये चीनमध्ये ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीतील ग्राहकांकडून करण्यात आलेल्या स्मार्टफोनच्या मागणीत 20 टक्क्यांनी घट झाली असल्याची माहिती रिसर्च फर्म आयडीसीकडून सादर करण्यात आलेल्या अहवालातून नोंदवण्यात आले आहे.

चिनी बाजारात हा फटका स्मार्टफोन कंपन्यांना बसण्याचे कारण असे आहे की, चीनच्या अर्थव्यवस्थेचा प्रवास सध्या मंदगतीने चालू आहे आणि त्यामुळे अनेक वस्तुंच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. आणि त्यामुळे स्मार्टफोन विक्रीला  ही त्याची झळ पोहोचत असल्याचे नोंदवण्यात आले आहे. त्यामध्ये ऍपल कंपनीला यांचा फटका बसल्याचे दिसून आले आहे. 

रिटेलर्सने किंमतीत घट

चीनमधील आयफोन मागणीत घट झाल्याच्या कारणांमुळे मुख्य इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर्सने मागील काही महिन्यात लेटेस्ट मॉडेलच्या किंमतीत 20 टक्क्यांनी कमी केल्या आहेत. यांच्या परिणामामुळे आयफोन एक्सआर 13500 रुपयापर्यंत स्वस्त झाला असल्याचे म्हटले आहे.

चीनचे स्मार्टफोन मार्केट डिसेंबर 2018मध्ये 9.7 टक्क्यांनी घट होत गेले आहे. सध्या असणाऱया वातावरणामुळे 5 जी ची हिस्सेदारी कमी होत गेली आहे. त्यामुळे जादाची उम्मीद चीनमध्ये न राहिल्याचे यावेळी नोंदवण्यात आले आहे.

Related posts: