|Monday, March 30, 2020
You are here: Home » Top News » उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस राजकारणातले बेस्ट कपल : मुंडे

उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस राजकारणातले बेस्ट कपल : मुंडे 

ऑनलाईन टीम /  मुंबई : 

विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडवली आहे. मुंडेंच्या मते उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजकारणातील बेस्ट कपल आहेत. त्यांनी तसं त्यांच्या ट्विटर अकाउंटवर ट्वीटही केले आहे.

‘यांच्या शिवाय दुसरे कोणते बेस्ट कपल असू शकते का? मागील  पाच वर्षे रोज कितीही भांडले तरी पुन्हा एकत्रच… केवढा तो एकमेकांवर जीव… नाही का? असे  धनंजय मुंडे यांनी व्हॅलेंटाईन डेचे औचित्यसाधून त्यांच्या ट्विटर अकाउंटवर उपहासात्मक ट्वीट केले  आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचा फोटोही जोडला आहे. मागील काही दिवसांपासून शिवसेना-भाजपामध्ये युतीची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. गेल्या साडेचार वर्षात उद्धव ठाकरे यांनी अनेकवेळा भाजपाच्या भूमिकेला विरोध केला आहे. सत्तेतून बाहेर पडू, अशी अनेकदा धमक्याही दिल्या आहेत. अनेक जाहीर सभांमध्ये देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. मात्र या सर्व घडामोडीनंतर आगामी लोकसभा निवडणूकीमध्ये सेना-भाजपची युती होऊन जागांसाठी 50-50 फॉर्मूला होणार असल्याच्या चर्चा पुन्हा सुरु झाल्या आहेत. इतका विरोध होऊन सुद्धा पुन्हा युती होणार असल्याने ट्वीटच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांनी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

Related posts: