|Saturday, August 24, 2019
You are here: Home » leadingnews » शरद पवार माढय़ातून लोकसभेच्या रिंगणात ; राष्ट्रवादीच्या बैठकीत शिक्कामोर्तब

शरद पवार माढय़ातून लोकसभेच्या रिंगणात ; राष्ट्रवादीच्या बैठकीत शिक्कामोर्तब 

ऑनलाईन टीम / मुंबई :

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार माढय़ातून लोकसभा निवडणुक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत आज या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे माढा मतदारसंघाचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचा पत्ता कट होणार आहे.

गेल्या काही दिवासांपूर्वी पुण्यात झालेल्या बैठकीत शरद पवार यांनी लोकसभा माढय़ातून निवडणुक लढवण्याचा विचार करू असे वक्तव्य केले होते. त्यावर राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आले होते. तसेच राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांना पवारांनी माढय़ातून निवडणूक लढवावी अशी इच्छा व्यक्त केली होती.काल रात्री रामराजे निंबाळकर यांच्या निवास्थानी बैठक झाली होती त्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील यांनी मी नाराज नाही. मी स्वतः शरद पवार यांना माढा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची मागणी केली असेही ते म्हणाले. त्यानंतर आज झालेल्या बैठकीत शरद पवार माढय़ातून लोकसभा निवडणुक लढणार असल्याचे स्पष्ट झाले.