|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » Top News » मुलायम सिंह यांचे वय झाले आहे, कधी काय बोलायचे कळत नाही : राबडी देवी

मुलायम सिंह यांचे वय झाले आहे, कधी काय बोलायचे कळत नाही : राबडी देवी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधन व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त करुन मुलायमसिंह यादव यांनी मोदीविरोधकांना बुचकळय़ात टाकले आहे. मुलायमसिंह यांच्या या वक्तव्यामुळे विरोधी पक्षांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यनीही मुलायमसिंह यादव यांच्यावर टीका केली असून त्यांचं वय झाले असल्याचे म्हटलं आहे.  

   मुलायम सिंह यांचे वय झालं आहे. कधी काय बोलायचं हे त्यांच्या लक्षात राहत नाही. त्यांच्या बोलण्याचा काही अर्थ नाही’, असं राबडी देवी यांनी म्हटलं आहे. मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधन झाले पाहिजेत असे विधन करुन मुलायम सिंह यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. मोदी पुन्हा पंतप्रधन बनले पाहिजेत अशी माझी इच्छा आहे असे मुलायम सिंह आपल्या भाषणात म्हणाले. समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या महाआघाडीने भाजपाविरोधत एल्गार पुकारला असतानाच समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव यांनी मोदींचे कौतुक केले.