|Sunday, April 21, 2019
You are here: Home » leadingnews » जम्मूच्या अवंतीपोरात दहशतवाद्यांकडून स्फोट ; 30 जवान शहीद

जम्मूच्या अवंतीपोरात दहशतवाद्यांकडून स्फोट ; 30 जवान शहीद 

ऑनलाईन टीम / श्रीनगर :

जम्मू- काश्मीरमधील अवंतपोरा येथे केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या (सीआरपीएफ) एका तुकडीवर दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात 30 जवान शहीद झाले तर 35 हून अधिक जवान जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. दहशतवाद्यांनी आयईडी स्फोट केला.  या वर्षातला आतापर्यंतचा हा सर्वात मोठा हल्ला आहे.

जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा भागातील गोरीपोरा येथे हा हल्ला झाला. या आयईडी स्फोटानंतर गोळीबाराचेही आवाज येत होते अशी माहिती मिळाली आहे.

Related posts: