|Saturday, August 24, 2019
You are here: Home » विविधा » जपानमधील ही भन्नाट ट्रेन पाहिली आहे का ?

जपानमधील ही भन्नाट ट्रेन पाहिली आहे का ? 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

जपान जगातल्या आघाडीच्या विकसीत देशांपैकी एक आहे. जपानाच सतत होणारा विकास सगळय़ांना माहीत आहे. येथील स्वच्छता आणि हायटेक गोष्टींची नेहमीच चर्चा होत असते. येथील अशाच एका टेनची सध्या चर्चा सुरू आहे. या टेनचे नाव आहे  सनराईज एक्स्प्रेस.

या टेनचे फोटो पाहून तुम्हाला आयुष्यात एकदा तरी याने प्रवास करण्याची इच्छा होईल.बाहेरून भलेही ही टेन साधी वाटत असली तरी आतून मात्र या टेनचा नजारा आश्चर्यचकित करणार आहे. ही टेन डबल डेकर असून या टेनला 7 बडे आहेत. ही टेन 953 किमीचा प्रवास करते.