|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Automobiles » मारूतीने बंदे केले इग्निसचे प्रॉडक्शन , जुन्या मॉडेलवर 1 लाखांचा डिस्काउंट

मारूतीने बंदे केले इग्निसचे प्रॉडक्शन , जुन्या मॉडेलवर 1 लाखांचा डिस्काउंट 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मारुती-सुझुकीने आपली प्रीमिअम हॅचबॅक कार इग्निसचे प्रॉडक्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी या मॉडेलच्या बदल्यात नवीन मॉडेल लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. तसेच जुन्या मॉडेल्सची विक्री वाढवण्यासाठी आणि स्टॉक संपवण्यासाठी आता कंपनी ग्राहकांना 1 लाख रुपयांपर्यंतचा डिस्काउंट देत आहे.

कंपनीकडून नेक्सा शोरुममध्ये या कारची विक्री सध्या सुरू आहे. इग्निसची विक्री मारुतीच्या दुसऱया कारच्या तुलनेत खूप कमी आहे. कंपनीने गेल्या काही महिन्यात फक्त 2500 युनिट्स विकले. एक्स शोरुममध्ये इग्निसची किंमत 4,66,509 रुपये आहे. आता डिस्काउंटसह ही कार 3,66,509 रुपयांत मिळू शकेल जून 2018 मध्ये मारुतीने इग्निसचे डीझेल मॉडेल बंद केले होते. इग्निसची मागणी कमी झाल्याने डीझेल मॉडेल बंद करत असल्याचे स्पष्टीकरण मारुतीने दिले होते. इग्निसच्या डीझेल व्हॅरिएंटची मागणी फक्त 10 टक्के होते. त्यामुळे, कंपनीने हा निर्णय घेतला.