|Sunday, February 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मळा पणजी येथील हेल्थवे इस्पितळात 16 रोजी मधुमेह शिबिर

मळा पणजी येथील हेल्थवे इस्पितळात 16 रोजी मधुमेह शिबिर 

प्रतिनिधी  / पणजी :

जगात सर्वत्र मधुमेह हे विकृती आणि मृत्युचे एक प्रमुख कारण ठरत आहे. जर या रोगावर रुग्णाने नियंत्रण ठेवले नाही तर डोळे, हृदय, मूत्रपिंड आणि पाय या अवयवांवर विपरीत परिणाम होऊ शकतात. गोव्यात मधुमेहाचा पायवर अधिक दुष्परिणाम होतो हे हल्लीच झालेल्या सर्वेक्षणात दिसून आले आहे. याचा पूर्ण अभ्यास करून हेल्थवे इस्पितळ मळा पणजी येथे इस्तिपळातफ्xढ शनिवार दि. 16 रोजी ‘मोफ्ढत मधुमेह फ्tढट (पाय) शिबिर’ ठेवण्यात आल्याची मा†िहती हेल्थवे इस्पितळाच्या सल्लागार मधुमेह तज्ञ डॉ. प्रीतम कळंगुटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी त्यांनी सांगितले की, आपण सांस्कृतिक कार्यक्रमांचा सराव करताना अनवाणी असतो तसेच अयोग्यप्रकारे चप्पल घालतो यामुळे आपले पाय हेच मधुमेहाला बऱयाचदा कारणीभूत ठरतात. गोमंतकीयांनी याबाबत जागृत होणे गरजेचे आहे तसेच त्यांना याचे महत्व समजले पाहीजे व या उद्देशाने पुणे महाराष्ट्र येथील मधुमेह तज्ञ शिबिरात मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत तसेच गोमंतकीय डॉक्टरही मार्गदर्शन करतील.

डॉ. प्रीतम कळंगुटकर यांनी सांगितले की, मधुमेह हा सर्वात भयंकर रोग असून यावर योग्यवेळी उपाचर केले नाही तर तो कर्करोगाहूनही घातक आहे. भारत देशात 75 दशलक्ष (मिलीयन) रुग्ण आहेत हा सर्वेक्षणातून मिळालेला आकडा आहे. जगात मधूमेह रोगामध्ये भारत तिसऱया क्रमांकावर आहे. मधुमेह रोग हा दोन प्रकारचा असतो. अल्पकालीन आणि दीर्घकालीन. यामध्ये दीर्घकालीन रोग हा अत्यंत घातक आहे. गोव्यात ग्रामीण भागामध्ये मधुमेहाचे रुग्ण मोठय़ाप्रमाणात वाढत आहे. हे रुग्ण डॉक्टरांचा सल्ला घेतात पण तेव्हा उशीर झालेला असतो. योग्यवेळी उपचार केल्यास त्या रोगावर मात करता येते.

डॉ. प्रीतम कळंगुटकर यांनी सांगितले की, गोव्यात पायापासून मधुमेह होण्याचे प्रकार अधिक आहेत. याचे कारण म्हणजे ग्रामीण भागात लोक अनवाणी फ्ढाrरत असतात व त्याचप्रमाणे चप्पल देखील घालत नाही. आपणाला वाटते की माणसाला केवळ हृदयविकाराचा झटका येतो पण तसे नसून मधुमेहाचा झटकाही बऱयाचदा येतो. आपण अनवाणी चालल्याने पायाला संसर्ग होतो व सदर व्यक्तीने योग्यवेळी योग्यउपचार न घेतल्यास तो भागही कापून जाण्याची शक्यता असते. महिला पायात वेढण (जोडवी) घालतात व याठिकाणी जर जखम झाली तर तीदेखील मधुमेहाला कारणीभूत ठरु शकते. त्यामुळे महिलांनी काळजी घेतली पाहीजे.

Related posts: