|Sunday, February 23, 2020
You are here: Home » Top News » ‘सर्जिकल स्ट्राइक’च्याही पुढे जाऊन पाकचा सोक्षमोक्ष लावाः उद्धव ठाकरे

‘सर्जिकल स्ट्राइक’च्याही पुढे जाऊन पाकचा सोक्षमोक्ष लावाः उद्धव ठाकरे 

ऑनलाईन टीम / मुंबई :

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानं अख्खा देश सुन्न झाला आहे. सीआरपीएफच्या 37 शहीद जवानांना श्रद्धांजली वाहतानाच, या हल्ल्याचा उरीसारखा बदला घ्या, अशी तीव्र भावना व्यक्त होतेय. या पार्श्वभूमीवर, केंद्रातील नरेंद्र मोदीसरकारने, दहशतवाद्यांना पोसणाऱया पाकिस्तानविरोधात कठोर पावलं उचलण्याचा निर्धार केला आहे.

पाकिस्तानवर राजनैतिक पातळीवर बहिष्कार टाकण्याची ठाम भूमिका केंद्र सरकारनं घेतली आहे. पाकिस्तानला देण्यात आलेला ‘मोस्ट फेवर्ड नेशन’चा दर्जा काढून घेण्याच्या दिशेनंही पावलं उचलली जाणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज झाली. पुलवामा दहशतवादी हल्लासंबंधीच्या प्रत्येक ठळक बाबीवर या बैठकीत चर्चा झाली. हा हल्ला घडवणाऱयांना आणि त्यासाठी मदत करणाऱयांना मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा अरुण जेटली यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिला.

 

Related posts: