|Sunday, March 29, 2020
You are here: Home » उद्योग » औषध,धातू ,ऑटोच्या कमजोरीने बाजारात घसरण

औषध,धातू ,ऑटोच्या कमजोरीने बाजारात घसरण 

सेन्सेक्स 67 तर निफ्टीचा निर्देशांक 21.65 अंकानी  घसरणीसह बंद

प्रतिनिधी / मुंबई

भारतीय शेअर बाजार (बीएसई) व राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) यांच्या कमजोर कामगिरीने सप्ताहातील शेवटच्या सत्रात शेअर बाजारात घसरणीची नोंद केली झाली. मागील तीन दिवसांमध्ये महागाई निर्देशांकातील मागील सतरा महिन्यातील सर्वोच्च घटीची नोंद आणि महत्वाच्या क्षेत्रांत झालेली नफा कमाई या कारणामुळे बीएसई व एनएसईने मान टाकली. तसेच काहीसे वातावरण शुक्रवारी शेअर बाजारात राहिल्याचे दिसून आले.

दिग्गज क्षेत्रांमध्ये शुक्रवारी औषध, धातू, ऑटो आणि बँकिग यांच्या निर्देशांकात सर्वाधिक घसरण होत निर्देशांक बंद झालेत. तर विदेशी फंडाचा होणारा पुरवठा व नफा कमाई या घटकांनी शेअर बाजारावर नकारात्मक सावलीचा परिणाम झाल्याचे पहावयास मिळाले. यात ऊर्जा व पीएसयू यांचे शेअर्सची शेवटच्या एक तासात नफा कमाईने करण्याचा प्रयत्न झाला परंतु त्याने बाजाराला झेपावण्यात यश आले नाही.

 बीएसईच्या मुख्य 30 कंपन्यांचा निर्देशांक खाली सरकत 365 अंकावर पोहाचल्यासह दिवसभर निर्देशांक चढ-उताराचे टप्पे करत राहिला. शेअर बाजार बंद होताना 67.27 अंकानी सेन्सेक्स कमजोर होत 35,808.95 वर बंद झाला. एनएसई निफ्टी 21.65 अंकानी घसरण होत 10,724.40 वर बंद झाला.

सप्ताहात बीएसई निर्देशांक 737.53 अंकानी घसरला असून एनएसईचा निर्देशांक 219.20 ने खाली गेल्याचे नोंदवण्यात आले. दिग्गज कंपन्यांमध्ये सन फार्मा, टाटा स्टील, वेदान्ता, हीरोमोटो कॉर्प, बजाज फायनान्स, स्टेट बँक, ऍक्सिस बँक, एचडीएफसी आणि मारुती यांचे निर्देशांक 3.94 टक्क्यांनी कोसळलेत. एनटीपीसी, कोल इंंडिया, भारती एअरटेल, रिलायन्स इंडस्ट्रीज , लार्सन ऍण्ड टुब्रो यांचे निर्देशांक प्रामुख्याने 4.13 टक्क्यांनी वधार नोंदवली.

नवीन सप्ताहात लोकसभा निवडणूक व काश्मीरमधील झालेला भीषण दहशतवादी हल्ला या घटनांचा प्रभाव शेअर बाजारात  दबाव निर्माण करण्याचा अंदाज तज्ञांकडून व्यक्त होत आहे.

Related posts: