|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » शहराची श्रीमंती वाढविण्याचे काम

शहराची श्रीमंती वाढविण्याचे काम 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

शहराच्या सौंदर्यीकरणाव्दारे स्थानिक नागरिकांना आनंद मिळावा तसेच पर्यटक आकर्षित व्हावेत यावर अधिक भर दिला जात आहे. या उपक्रमाव्दारे शहराची श्रीमंती वाढविण्याचेच काम होत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. पोलीस उद्यानामध्ये ट्राफिक स्कूल विकसित करण्यात येणार आहे. अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडय़ासाठी 89 कोटींचा निधी मंजूर असून पहिल्या टप्प्यात दर्शन मंडपाचे काम करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

         कोल्हापूर रस्ते सौदर्यीकरण प्रकल्पाच्यावतीने (केएसबीपी) ताराबाई पार्क येथे विकसित केलेल्या आकार उद्यानाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.   यावेळी  डॉ. अभिजित चौधरी, पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, पोलीस उपअधिक्षक प्रशांत अमृतकर, नगरसेवक सत्यजित कदम, सुनिल कदम, रत्नेश शिरोळकर, विजय सुर्यवंशी, आशिष ढवळे, संदिप देसाई, केएसबीपीचे सुजय पित्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

          पालकमंत्री पाटील म्हणाले, शहरात गार्डन विकसित करणे, चौकांचे सुशोभिकरण, रस्ते दुभाजकांमध्ये फुलझाडे अशा विविध शहर सौंदर्यीकरणाच्या गोष्टी विकसित केल्या आहेत. यापुढील काळातही शहराच्या प्रत्येक भागात ओपनस्पेस विकसित करण्यात येत आहे. यामध्ये उद्याने मंदीरे अशा विविध गोष्टी विकसित करण्यासाठी मदत केली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. 

याप्रसंगी कोल्हापूर रस्ते सौदयीकरण प्रकल्पाचे सुजय पित्रे यांनी आकार उद्यान हे भूमीती या संकल्पनेवर आधारित विकसित केले असून भविष्यातही हे उद्यान अतिशय नेटके आणि सुंदर राहील असा विश्वास व्यक्त केला. यावेळी भाजप गटनेते विजय सूर्यवंशी, नियोजन समितीचे सदस्य राजाराम शिपुगडे, नगरसेविका अर्चना पागर, उमा इंगळे, सीमा कदम, कविता माने, स्मिता माने, नगरसेवक सुनील कदम, रत्नेश शिरोळकर, शेखर कुसाळे, बाळासाहेब यादव, संवेदना सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष राहूल चिकोडे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे जिल्हा समन्वयक विजय जाधव उपस्थित होते.

‘दादा’ सिंहासारखे पाठीशी

महापालिकेमध्ये केएसबीपीच्या माध्यमातून शहरातील चौकांचे सुशोभिकरण करण्याचा प्रस्ताव होता. सत्ताधाऱयांनी प्रस्ताव नाकारला हे दुर्देवी असल्याचे गटनेते सत्यजित कदम यांनी सांगितले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील सर्व नगरसेवकांच्या सिंहासारखे पाठीशी असून मनपामध्ये सत्ता नसतानाही त्यांच्याकडून सहकार्य मिळत आहे. ताराबाई पार्क प्रभागामध्ये बी टय़ुनर तसेच नागरी सुविधांचा आभाव असून येथील समस्या मार्गी लावा, अशा सूचनाही कदम यांनी केली.

दर्शन मंडपासाठी 89 कोटी

         गेल्या साडेचार वर्षात कोल्हापूर शहर आणि जिह्यात लोकांना आनंद देणारे नवनवे प्रकल्प हाती घेतले असून पर्यटनाला विशेष चालना दिली आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाई (श्री महालक्ष्मी) मंदीर विकासासाठी 89 कोटीचा निधी मंजूर करुन आणला असून पहिल्या टप्यात दर्शन मंडपाचे काम प्राधान्यक्रमाने हाती घेतले जाईल, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.

        

Related posts: