|Friday, August 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » संकेश्वर येथे कंटेनरमधील कारला आग

संकेश्वर येथे कंटेनरमधील कारला आग 

प्रतिनिधी/ संकेश्वर

हुबळीहून पुण्याकडे जाणाऱया कंटेनरमधील कारला अचानक आग लागल्याची घटना संकेश्वरनजीक पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी घडली. यामध्ये कारचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

हुबळी येथून कार घेऊन कंटेनर पुण्याकडे जात होता. दरम्यान संकेश्वरनजीक आल्यानंतर अचानक कंटेनरमध्ये असलेल्या कारला आग लागली. कारला आग लागल्याचे चालकाच्या लक्षात आल्याने त्याने तातडीने कंटेनर रस्त्याकडेला थांबविला व याची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलिसांसह अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र कारचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.