|Friday, October 18, 2019
You are here: Home » Top News »  ‘द कपिल शर्मा शो’मधून सिद्धूची हाकालपट्टी ; पुलवामा हल्ल्यानंतर केलेली प्रतिक्रिया भोवली

 ‘द कपिल शर्मा शो’मधून सिद्धूची हाकालपट्टी ; पुलवामा हल्ल्यानंतर केलेली प्रतिक्रिया भोवली 

ऑनलाईन टीम / मुंबई :

जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या दहशवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. त्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियेनंतर ‘द कपिल शर्मा शो’मधून माजी क्रिकेटर आणि काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांना हटवण्यात आल्याची सूत्रांची माहिती मिळाली आहे.

‘केवळ काही लोकांमुळे पूर्ण पाकिस्तानला दोषी ठरवणे योग्य होणार नाही. असे वक्तव्य नवज्योत सिंग सिद्धू यांनी केले आहे. या वक्तव्यानंतर देशभरात नवज्योत सिंह सिद्धूंच्याविरोधत संतापाची लाट उसळली होती. याचा फटका आता सिद्धू यांना बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार नवज्योत सिंग सिद्धू यांना ‘द कपिल शर्मा शो’ हटवण्यात आले आहे. त्यांच्या जागी अनेक कॉमेडी शो जज केलेली अभिनेत्री अर्चना पूरण सिंह दिसणार असल्याचेही समोर येत आहे. सिद्धू यांच्या वक्तव्यामुळे देशभरातून त्यांच्यावर टीक होत आहे. जनतेच्या रागाचा फटका शोला बसू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून ‘द कपिल शर्मा शो’च्या निर्मात्यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

सिद्धू काय म्हणाले होते ?

सिद्धू यांनी पुलवामा हल्ल्याचा कठोर शब्दात निषेध केला होता. मात्र केवळ काही लोकांमुळे पूर्ण पाकिस्तानला दोषी ठरवणे योग्य होणार नाही असे सिद्धू म्हणाले होते. फक्त संवादातूनच पाकिस्तानसोबत असलेले संबंध सुधरतील असे सिद्धू यांनी म्हटले आहे. तर या हल्ल्याचा निषेध करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. 4000 जवान जात असताना त्याना कोणतीही सुरक्षा नाही? असू होऊचं कसे शकते असा सवाल सिद्धू यांनी उपस्थित केला आहे. तसेच गुप्तचर यंत्रणांवरसुद्दा प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. दहशतवाद्यांच्या मुद्यावर चर्चेतूनच कायमचा तोडगा निघू शकतो. आपल्या जवानांनी कधीपर्यंत बलिदान द्यायचे? आता या गोष्टींच्या मूळापर्यंत जाऊन त्यावर कायमचा उपाय काढला पाहिजे. एकमेकांवर आरोप करुन काही फायदा होणार नाही, असे सिद्धू म्हणाले.