|Monday, September 23, 2019
You are here: Home » Top News » RAW ने घडवला पुलवामा हल्ला , पाकिस्तानच्या उलटय़ा बोंबा

RAW ने घडवला पुलवामा हल्ला , पाकिस्तानच्या उलटय़ा बोंबा 

ऑनलाईन टीम / श्रीनगर :

जम्मू काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानने पुन्हा एकदा उलट्या बोंबा मारण्यास सुरुवात केली आहे. हल्ल्यानंतर दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने जबाबदारी घेऊनही पाकिस्तान मात्र उलट भारतावरच आरोप करत आहे. पाकिस्तान भारतीय हल्ल्याचे खापर भारतीय गुप्तचर यंत्रणेवर फोडत आहे. पाकिस्तानचे माजी गृहमंत्री आणि पाकिस्तान पिपल्स पार्टीचे नेते रहमान मलिक यांनी हा हल्ला म्हणजे भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉ ने रचलेलं षडयंत्र असल्याचं म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयात प्रलंबित असलेल्या कुलभूषण जाधव प्रकरणावरुन लक्ष हटवण्यासाठी रॉ ने हल्ला केल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे.

पाकिस्तानी वृत्तपत्र ‘द डॉन’ने दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधताना रहमान मलिक यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्यासाठी भारतीय गुप्तचर यंत्रणेला जबाबदार ठरवले.. पाकिस्तानच्या माजी गृहमंत्र्यांचं बरळणं एवढ्यावरच थांबलं नाही. भारत प्रत्येक हल्ल्याचा आरोप पाकिस्तानवरच करत असतो असेही ते म्हणाले.