|Sunday, February 23, 2020
You are here: Home » Top News » रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मार्गावर आज मेगाब्लॉक

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मार्गावर आज मेगाब्लॉक 

ऑनलाईन टीम /  मुंबई :

 रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे रुळ, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड वायरच्या दुरुस्ती आणि देखभालीच्या कामासाठी तिन्ही मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 3.40 दरम्यान हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याणदरम्यान धीम्या मार्गावर, पश्चिम रेल्वेवर जलद मार्गावर बोरिवली-अंधेरीदरम्यान आणि हार्बर रेल्वेवर कुर्ला-वाशीदरम्यान अप-डाऊन मार्गावर मेगाब्लॉग मेगाब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याणदरम्यान धीम्या मार्गावर सकाळी 10.47 ते दुपारी 3.24 वाजेपर्यंत हा मेगब्लॉक घेण्यात येणार आहे. या दरम्यान सर्व गाड्या जलद मार्गावर धावतील. मेगाब्लॉकमुळे वाहतूक 10 मिनिट उशिराने असेल. पश्चिम रेल्वेवर जलद मार्गावर बोरिवली-अंधेरीदरम्यान सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. मेगाब्लॉकदरम्यान जलद मार्गावरील गाड्या धीम्या मार्गावरून धावतील. हार्बर रेल्वेवर कुर्ला-वाशीदरम्यान सकाळी 11.10 ते दुपारी 3.40 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 10.34 ते दुपारी 3.08 वाजेपर्यंत अप आणि डाऊन मार्गावरील गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लॉकदरम्यान सीएसएमटी ते कुर्ला आणि कुर्ला ते पनवेलदरम्यान विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.

Related posts: