|Thursday, December 12, 2019
You are here: Home » leadingnews » जी आग तुमच्या मनात धुमसत आहे, तीच माझ्याही मनात भडकत आहे – नरेंद्र मोदी

जी आग तुमच्या मनात धुमसत आहे, तीच माझ्याही मनात भडकत आहे – नरेंद्र मोदी 

ऑनलाईन टीम / पाटणा :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा मोठे वक्तव्य केले आहे. तुमच्या आणि देशवासीयांच्या मनात किती आग लागली आहे त्याचा अनुभव मला येत आहे. जी आग तुमच्या मनात लागली आहे. तशीच ती माझ्या मनातही लागली आहे. असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाविरोधात कठोर कारवाई करण्याचा पुनरुच्चार केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहार दौऱयावर होते. तेथे विविध विकासकामांच्या भूमिपूजन केल्यानंतर मोदींनी उपस्थितांना संबोधित केले. त्यावेळी मोदींनी सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या बिहारमधील जवानांना श्रद्धांजली वाहिली. पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात शहीद झालेले पाटणा येथील जवान संजयकुमार सिन्हा आणि भागलपूर येथील जवान रतनकुमार ठाकूर यांना मी आदरांजली वाहतो. त्यांच्या कुटुंबाप्रति मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. पुलवामा येथील हल्यानंतर तुमच्या आणि देशवासीयांच्या मनात किती आग लागली आहे त्याचा अनुभव मला येत आहे. जी आग तुमच्या मनात लागली आहे. तशीच ती माझ्या मनात लागली आहे. आज बिहार दौऱयादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाटणा येथील शहरी विभागात 3 हजार 200 चौ.कि.मी. परिसरातील 9.75 लाख कुटुंबांना पीएनजी आणि वाहनांना सीएनजी पुरवणाऱया प्रकल्पाचे उद्धाटन केले. तसेच सुलतानगंज आणि नवगछिया येथे सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे उदघाटन केले.

Related posts: