|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » Top News » मनसेला महाआघाडीत घेण्यासंदर्भात अद्याप निर्णय नाही – अशोक चव्हाण

मनसेला महाआघाडीत घेण्यासंदर्भात अद्याप निर्णय नाही – अशोक चव्हाण 

ऑनलाईन टीम / सोलापूर :

आगामी निवडणुकीसाठी मनसेला महाआघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादीकडून प्रस्ताव आलेला आहे. मात्र यावर अद्याप निर्णय झालेला नाही, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

मनसेला आघाडीत घेण्यासंदर्भात मतभिन्नता आहे. त्यामुळे राज्यातील वरि÷ नेत्यांशी आणि केंद्रातील नेत्यांशी चर्चा करुन पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती अशोक चव्हाण यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. संत सेवालाल जयंतीनिमित्त सोलापुरातील मुळेगाव तांडा येथे बंजारा समाजाच्या वतीने आयोजित मेळाव्यासाठी अशोक चव्हाण उपस्थित होते.

अजित पवार आणि राज ठाकरे यांची काही दिवसांपूर्वी भेट झाली होती. राज ठाकरे यांच्यासोबत भेट झाल्यानंतर अजित पवार सांगितले होते, मी राज ठाकरेंना भेटलो. संवाद झाला पाहिजे, चर्चा झाली पाहिजे म्हणून आमची भेट झाली. मनसेला महाआघाडीत घेण्याबाबत काँग्रेसला कळवले आहे. आम्हीही वरि÷ांना कळवू, असे अजित पवारांनी सांगितले होते. पुढे अजित पवार म्हणाले, जागांबाबत चर्चेचा प्रश्नच नव्हता. आधी दोन्ही पक्षांनी मनसेला आघाडीत घेण्याबाबत स्वीकारलं पाहिजे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आघाडीसोबत आले तर फायदाच होईल, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे ज्ये÷ नेते छगन भुजबळ यांनी केले होते.

Related posts: