|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » Top News » पुलवामातील शहीदांना मदत करतांना सावधान, खोटय़ा वेबसाईटवरून फसवणूक

पुलवामातील शहीदांना मदत करतांना सावधान, खोटय़ा वेबसाईटवरून फसवणूक 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे दहशतवाद्यांनी भारताच्या सीआरपीफ जवानांवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. देशभरातूनत या शहीदांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी अनेकजण पुढे सरसावले आहेत. परंतु काही समाजकंटक मदत करणाऱया लोकांची आर्थिक फसवणूक करत आहेत. मदत करणाऱया लोकांच्या भावनांशी खेळ केला जात आहे.

काही भामट्यांनी खोट्या संस्था स्थापन करुन लोकांचे पैसे हडपण्याचा प्रयत्न सुरु केला असल्याची धक्कादायक माहिती स्वतः केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे. ट्विटरद्वारे सिंह यांनी याबद्दल इशारा दिला आहे. या भामट्यांनी काही खोटी संकेतस्थळे सुरु केली आहे. या संकेतस्थळांच्या लिंक्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पुलवामा हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबीयांना सरकारसह अनेक लोक आर्थिक मदत करत आहेत.

https://twitter.com/HMOIndia/status/1096790633367437313

शहीदांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी अनेक संस्था, लोकांकडून आवाहन केले जात आहे. परंतु, काही भामटे लोकांच्या भावनांशी खेळ करत आहेत. लोकांचा मदतनिधी वेगळय़ा मार्गाने जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सरकारच्या https://bharatkeveer.gov.in/ (भारत के वीर) या वेबसाईटवरच मदत करण्याचे आवाहन केंद्रीय गृहमंत्रालयाकडून करण्यात आले आहे.