|Monday, December 9, 2019
You are here: Home » Top News » पुलवामा हल्ल्यानंतरचे वादग्रस्त विधान सिद्धूला भोवणार ; मंत्रिमंडळातून हकालपट्टीची शक्यता

पुलवामा हल्ल्यानंतरचे वादग्रस्त विधान सिद्धूला भोवणार ; मंत्रिमंडळातून हकालपट्टीची शक्यता 

ऑनलाईन टीम / अमृतसर :

जम्मू-काश्मिरच्या पुलवामा येथे दहशतवाद्यांनी भारताच्या सीआरपीएफ भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. या घटनेनंतर देशभरातून संतापाची लाट असळली आहे. देशभरातून पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्याची मागणी होत असतांना, मात्र माजी क्रिकेटर अन् पंजाबचे सांस्कृतिक मंत्री नवज्योत सिंह सिद्धूने मवाळ भूमिका घेतली आहे.

सिद्धूने भारतीयांच्या संतापावर नाराजी व्यक्त करत दोन्ही देशामधील वाद चर्चेतू न सोडविण्याचा सल्ला दिला. तसेच मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही सिद्धूने शहीद जवानाच्या अंत्यसंस्काराला गैरहजर राहिला. त्यामुळे देशभरातून सिद्धूविरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे. कालपासून सिद्धूला मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी होत आहे. पंजाबमधील अनेक मंत्र्यांनी देखील ही मागणी केली आहे. त्यामुळे सिद्धूची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related posts: