|Monday, September 23, 2019
You are here: Home » Top News » शहीदांचे खोटे व्हायरल फोटो शेअर करू नका : सीआरपीएफ

शहीदांचे खोटे व्हायरल फोटो शेअर करू नका : सीआरपीएफ 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

केंद्रीय राखीव सुरक्षा बल (सीआरपीएफ) जवानांवर पुलवामा येथे झालेल्या भीषण हल्ल्यानंतर जवानांच्या छिन्नविछिन्न अवयवांची चुकीची छायाचित्रे व्हायरल होत आहेत. यामुळे शहीदांचा अपमान होत असल्याने अशी छायाचित्रे आणि पोस्ट शेअर करू नका असे आवाहन सीआरपीएफने नागरिकांना केले आहे. याव्यतिरिक्त सीआरपीएफने काश्मीरी विद्यार्थ्यांच्या बाबतीतही एक ऍडव्हायजरी जारी केली आहे.

सीआरपीएफने जारी केलेल्या ऍडव्हायजरीत असे म्हटले आहे, पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर सोशल मीडियावर जवानांच्या छिन्नविछिन्न अवयवांची बनावट छायाचित्रे व्हायरल होत आहेत. समाजकंटकांकडून अशा पद्धतीची शहीदांचा अपमान करणारी छायाचित्रे व्हायरल केली जात असतील तर आपण एकत्र येऊन ही समाजविघातक कृती रोखली पाहिजे. कृपया अशी छायचित्रे आणि पोस्ट फॉरवर्ड, शेअर, लाइक करू नका. अशी कोणतीही बाब तुमच्या निदर्शनास आली तर webpro@crpf.gov.in या संकेतस्थळावर कळवा.