|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » न.पं.च्या 35 कर्मचाऱयांचे आजपासून ‘कामबंद’ आंदोलन

न.पं.च्या 35 कर्मचाऱयांचे आजपासून ‘कामबंद’ आंदोलन 

प्रतिनिधी / देवगड:

देवगड-जामसंडे न. पं. मधील केवळ 11 कर्मचाऱयांचे शासनाने समावेशन करून त्यांना सहाय्य योजनेंतर्गत वेतन देऊ केले आहे. मात्र, उर्वरित 35 कर्मचाऱयांना किमान वेतन देऊन त्यांच्यावर अन्याय केला आहे. त्यामुळे न. पं. च्या 35 कर्मचाऱयांनी 18 फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे. याबाबतचे निवेदन या कर्मचाऱयांनी मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांना दिले आहे.

देवगड- जामसंडे न. पं. मध्ये एकूण 46 कर्मचारी कार्यरत असून त्यापैकी केवळ 11 कर्मचाऱयांना सेवेत कायम करण्यात आले आहे. त्यांना शासनाच्या सहाय्यक योजनेतून वेतन दिले जात आहे. उर्वरित 35 कर्मचाऱयांना किमान वेतनावर ठेवण्यात आल्याने कर्मचारी संतप्त झाले आहेत. उर्वरित कर्मचाऱयांनी आमचे शासनामध्ये समावेशन करा अथवा समान वेतन द्या, अशी मागणी केली आहे. तसेच वर्ग 3 व 4 साठी वेतनाप्रमाणे 3 हजार रुपये ते 3 हजार 500 रुपयांपर्यंत वेतनवाढ करावी. अन्यथा, देवगड-जामसंडे न. पं. मधील अत्यावश्यक सेवांसह 18 फेब्रुवारीपासून बेमुदत आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.