|Monday, August 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » विलवडेत मोटरसायकलला गव्याची धडक

विलवडेत मोटरसायकलला गव्याची धडक 

प्रतिनिधी / बांदा:

बांदा-दाणोली रस्त्यावर विलवडे येथे गव्याची धडक बसल्याने दुचाकीस्वार जानू कृष्णा गवस (30, रा. वाफोली-वझरीवाडी) हे जखमी झाले. त्यांच्या दुचाकीचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. ही घटना शनिवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली.

 जानू गवस हे बांद्यातून ओटवणे येथे गेले होते. ते वाफोली येथे परतत असताना विलवडे येथे रस्त्यावर अचानक आलेल्या गव्याची धडक त्यांच्या दुचाकीला बसली. या धडकेने ते रस्त्यावर फेकले गेले, तर दुचाकी रस्त्यालगत गटारात जाऊन आदळली. या अपघातात गवस यांच्या डोक्मयाला दुखापत झाली. त्यांना पत्रकार अजित दळवी यांनी खासगी रुग्णालयात दाखल केले. रविवारी सकाळी गवस यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉ. जगदीश पाटील यांनी सांगितले.