|Friday, November 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » अतिरेक्यांनी लपवलेले बारा किलो आरडीएक्स सापडले

अतिरेक्यांनी लपवलेले बारा किलो आरडीएक्स सापडले 

रघुनाथ भोसले /रांजणी :

जम्मू आणि काश्मिर राज्यात श्रीनगर आणि कुपवाडा हा भाग संवेदनशील म्हणूनच ओळखला जातो अशा भागात सेवा बजावत असलेल्या सांगली जिह्यातील रांजणी गावचा संतोष कोळी या जवानाने अतिरेक्यांनी लपवलेले बारा किलो आरडीएक्स मोठी कामगिरी केली आहे होळी यांच्या या कामगिरीची अधिकायांनी दखल घेवून कौतुक केले असून युनिटकडे मेडलसाठी शिफारस केली आहे.

बारा किलो आरडीएक्स मोठा घातपात घडवू शकतो मात्र तो होण्यापूर्वी शोधून काढणे आणि त्याची विल्हेवाट लावणे हे कार्य फार महत्त्वाचे असते आपले सैन्यदल किती सावध आहे हेच यातून दिसून येते त्यामुळे सैनिकांचे गाव म्हणून भारतभर प्रसिद्ध असणाया रांजणी च्या या सुपुत्राने भारतीय लष्कराचे मान उंचावली आहे संतोष कोळी यांची सर्वत्र कौतुक होत आहे ते कुपवाडामध्ये गस्ती वेळी रात्री एक ची वेळ होती ते त्यांच्या डॉग सोबत गस्त घालते वेळी अचानक डॉग पुलाकडे वळला व अतिरेकाने लपवलेला साठा त्याने शोधून काढला लगेच त्यांनी वरिष्ठ अधिकायांना त्याची कल्पना दिली व आरडीएक्स  निकामी करणारे पथक दाखल झाले व पुढील घातपात टळला अशी माहिती दैनिक तरुण भारत शी बोलताना संतोष कोळी यांनी दिली ते सध्या गावाकडे सुट्टी वरती आले आहेत परवाच अतिरेक्यांनी केलेला मोठा हल्ला व त्यामध्ये झालेले जवान शहीद हे आठवण त्यांना आली असाच मोठे आरडीएक्स श्रीनगर कुपवाडा सापडला पुढील अनर्थ टळला असं ते म्हणाले                                                                                  

पुलाखाली आरडीएक्स मोठय़ा घातपात योजना

कोळी यांना सापडलेले आरडीएक्स हे पुलाखाली सापडले आहे त्यामुळे या मार्गावर मोठा घातपात घडवण्याचा अतिरेक्यांचा उद्देश स्पष्ट दिसून येतो आहे मात्र कोणतीही दुर्घटना घटना यापूर्वी भारतीय लष्कराच्या कर्तव्यदक्ष मुळे अतिरेक्यांचा हा मनसुबा उधळला गेला आहे नुकत्याच पुलवामा हल्ल्याच्या घटनेने या सापडलेल्या आरडीएक्स ला महत्त्व अधिक आहे.

संतोष कोळी यांची प्रतिक्रिया

मला सापडलेला हा मोठा साठा हा आर्मी च्या दृष्टीने महत्वाचा होता हा साठा सापडला नसता तर मोठा घातपात झाला असता हा साठा मी जानेवारीमध्ये श्रीनगर कुपवाडा या भागात असताना घडला रांजणी च्या मातीनेच आम्हाला शिकवले आहे की देशसेवा करायची या माझ्या कार्याची दखल घेऊन वरिष्ठांनी माझ्या मेडलसाठी शिफारस केली आहे व मला गावी जाण्यासाठी सुट्टी पण त्यांनी दिली प्रतिक्रिया दैनिक तरुण भारतशी बोलताना दिली.

Related posts: