|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » नेर्लेजवळ अपघातात नागठाणेचा वृद्ध ठार

नेर्लेजवळ अपघातात नागठाणेचा वृद्ध ठार 

प्रतिनिधी /इस्लामपूर :

पुणे-बेंगलोर दुतगती मार्गावर नेर्ले येथे मोटारसायकलला मारुती स्विफ्टने धडक दिल्याने शिवाजी बंडू जाधव (75 रा.नागठाणे, ता.पलूस) हा वृद्ध ठार झाला. हा अपघात रविवारी सकाळी 10 च्या सुमारास घडला.

प्रदीप बच्चाराम देसाई (कुपे, ता.गडहिंग्लज, जि.कोल्हापूर, सध्या रा.डोंबिवली मुंबई) हे स्विफ्ट कार एम.एच.02 सी.बी. 0543 ने कोल्हापूरहून मुंबईच्या दिशेने जात होते. यावेळी जाधव हे आपल्या मोटारसायकलने क्रमांक एम.एच.09 ए.ई. 6572 नेर्ले येथील महामार्ग ओलंडत असताना स्विफ्टने त्यांना जोराची धडक †िदली. यामध्ये जाधव हे गंभीर जखमी झाले. त्यांच्या पायाला व डोक्याला गंभीर इजा झाली होती. त्यांना इस्लामपूर येथील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी जाधव यांचा मुलगा जितेंद्र शिवाजी जाधव यांनी कासेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

Related posts: