|Monday, September 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » पेट्रोल-डिझेल दरात वाढ

पेट्रोल-डिझेल दरात वाढ 

नवी दिल्ली :

सलग चौथ्या दिवशी रविवारी इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईत आज पेट्रोलच्या दरात 16 पैशांनी तर डिझेलच्या किंमतीत 12 पैशांनी वाढ झाली आहे. मुंबईत रविवारी पेट्रोल 76.39 रुपये तर डिझेल 69.09 रूपये इतके आहे. राजधानी दिल्लीतही इंधन दरात वाढ झाली असून पेट्रोल 16 पैसे तर डिझेल 12 पैशांनी महागले आहे. दिल्लीत आज पेट्रोलचा दर 70.76 आणि डिझेल 65.98 रुपये इतका आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीचा परिणाम भारतीय बाजारातील इंधनाच्या किंमतीवरही होत आहे. 9 फेब्रुवारीनंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सतत वाढ होत आहे.