|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » जनाई दत्तनगरमध्ये पाकीस्तानची प्रतिकृती पेटवून निषेध

जनाई दत्तनगरमध्ये पाकीस्तानची प्रतिकृती पेटवून निषेध 

प्रतिनिधी /कोल्हापूर :

  सुर्वेनगर परिसरातील जनाई दत्तनगरमध्ये पाकिस्तानची प्रतिकृती पेटवून पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. तत्पुर्वी येथील महिलांनी प्रतिकृतीस चपलाचा प्रसाद देत भ्याड हल्याबाबत तीव्र संताप व्यक्त केला. याप्रसंगी बोलताना सामाजिक कार्यकर्ते अभिजीत खतकर म्हणाले, पुलवामा येथे झालेला दहशतवादी हल्ला निंदनीय आहे. पाकिस्तानच्या कुरघोडी रोखण्यासाठी त्यांना जशास तसे उत्तर देणे गरजेचे आहे. हिच शहीद जवानांना खरी श्रद्धांजली असेल. यावेळी उपस्थितांनी मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद, जला दो जला दो पाकिस्तान जला दो अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी शामराव केलुस्कर, आदिनाथ पाटील, बाबा पाटील, संग्राम पाटील, संजय व्हनागडे, राजू सुतार, गणेश आसगांवकर, निलेश देसाई, अमित शेलार, रोहित सांवत, राजेश चौगुले, योगेश चौगुले, विजय कराले, संतोष आळवेकर आदींसह परिसरातील महिला, विद्यार्थी मोठयासंख्येने उपस्थित होते.