|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » क्रिडा » लंकन संघात धनंजयचे पुनरागमन

लंकन संघात धनंजयचे पुनरागमन 

वृत्तसंस्था /कोलंबो :

दक्षिण आफ्रिकेविरूद्ध होणाऱया पाच सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी लंकन संघाची घोषणा करण्यात आली. या संघामध्ये फिरकी गोलंदाज अकिला धनंजयचे पुनरागमन झाले आहे.

गेल्या डिसेंबरमध्ये अकिला धनंजयच्या गोलंदाजीच्या पद्धतीमध्ये दोष आढळल्याने त्याच्यावर गोलंदाजी करण्यास आयसीसीने बंदी घातली होती पण धनंजयच्या गोलंदाजीच्या चाचणीमध्ये सुधारणा झाल्याने त्याला गोलंदाजी करण्यास परवानगी देण्यात आली. लंकन संघात चंडीमलला वगळण्यात आले आहे.

लंक संघ- मलिंगा (कर्णधार), ए फर्नांडो, थरंगा, डिक्वेला (उपकर्णधार), कुशल परेरा, कुशल मेंडीस, धनंजय डिसिल्वा, टी. परेरा, अकिला धनंजय, ए. परेरा, ओ. फर्नांडो, कामीनेडू मेंडीस, पी. परेरा, उदाना, व्ही. फर्नांडो, के. रजिता, एल. सँडीकेन